बीजिंग, 20 ऑगस्ट : कोरोनानंतर चीनवर आता अस्मानी संकट आलं आहे. एकीकडे पूराचा फटका लाखो लोकांना बसत असताना आता दक्षिण किनाऱ्यावर ‘हिगोस’ (Higos) चक्रीवादळ धडकल्यानं लोकांचे दुप्पट नुकसान झाले. चीनमध्ये सध्या पूर, भूस्खलन आणि तुफान पावसाचा फटका बसला आहे. पीपल्स डेली या अधिकृत वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, युवान प्रांतात दरड कोसळल्याने दोन घरे नष्ट झाल्यानंतर पाच लोक बेपत्ता आहेत. यिबीनमध्ये 21 गाड्या जमिनिखाली माध्यमांच्या वृत्तानुसार, सिचुआन प्रांतातील यिबिन शहरातील एका चौकात पार्क केलेल्या 21 गाड्या जमिनदोस्त झाल्या आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पावसामुळे अचानक रस्ता खचला आणि या 21 गाड्या खड्ड्यात गेल्या. हाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवानं यात कोणालाही इजा झाली नाही. वाचा- मर्सिडीज, बुगाटी आणि पोर्शची झाली टक्कर, नुकसान ऐकून येईल चक्कर; पाहा हे PHOTOS
वाचा- …आणि अचानक आकाशात दिसलं ‘फायर टॉर्नेडो’, पाहा दुर्मिळ VIDEO हॉंगकॉंगच्या किनाऱ्यावर चक्रीवादळाचा फटका हिगोस वादळ झुहाई शहराच्या किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वी हॉंगकॉंगच्या किनाऱ्यावरही धडक दिली. चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, वादळाचा फटका बसलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. शाळा बंद करण्यात आल्या असून बाधित किना-यावरुन अनेक फिशिंग बोटी बंदरात परत आल्या आहेत.