नवी दिल्ली 13 डिसेंबर : जंगली प्राणी अगदी जवळून पाहण्याची इच्छा असेल, तर जंगल सफारीपेक्षा चांगला पर्याय नाही. पण जर तुम्ही सफारीचा आनंद लुटत असाल आणि अचानक एक चित्ता उडी मारून तुमच्या गाडीत येऊन बसला तर? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कारमध्ये बसलेली व्यक्ती मात्र जराही न घाबरता व्हिडिओ रेकॉर्ड करत होती. बापरे! चक्क सिंहासोबत खेळायला गेला चिमुकला; पापी घेत जबड्यात हात टाकताच… व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस जंगल सफारीचा आनंद लुटताना दिसत आहे. पुढच्याच क्षणी एक चित्ता त्याच्या गाडीत उडी मारतो. आता तुम्ही विचार करत असाल की हा माणूस यानंतर प्रचंड घाबरला असेल. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे तो माणूस बेधडकपणे बिबट्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत राहतो. या दरम्यान चित्ता देखील व्यक्तीला इजा करत नाही. तो थोडावेळ गाडीच्या आतल्या वस्तूंकडे टक लावून पाहतो. यानंतर काय होतं, ते तुम्हीच व्हिडिओमध्ये पाहा.
ट्विटरवर @TansuYegen नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शननुसार, ‘तंजानियामध्ये जंगल सफारीदरम्यान एका माणसाच्या गाडीमध्ये चित्ता घुसला. मात्र ही व्यक्ती कोणतीही हालचाल न करता व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात करते. 1 मिनिट 7 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 26 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर 27 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. याशिवाय अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. अरेरे, बिच्चारा! हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्हाला चावणाऱ्या डासाचीसुद्धा येईल दया एका यूजरने कमेंट करत म्हटलं की, चित्ता माणसांवर हल्ला करत नाही. तर दुसऱ्या युजरनं लिहिलं आहे की, व्हिडिओ पाहिल्यानंतरच माझी अवस्था खराब झाली. आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, मला आशा आहे की तो माणूस जिवंत असेल. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.