इस्लामाबाद 29 ऑगस्ट : सोशल मीडियावर आपल्यासमोर कधी कोणता व्हिडीओ येईल याचा काही नेम नाही. लोकांना एखाद्या व्हिडीओमध्ये काही वेगळेपणा दिसला की, लोक त्याला शेअर आणि लाईक करतात. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ एका पाकिस्तानी रिपोर्टरचा आहे आणि आपल्या कामाप्रती तो किती समर्पित आहे, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कळेल. पाकिस्तानमधील पूर परिस्थीतीचा हा व्हिडीओ आहे. पूर आल्यामुळे तयार झालेल्या नाल्यामधून एका रिपोर्टर रिपोर्टींग करत आहे. तो या नाल्याच्या आजूबाजूला उभा राहून नाही तर, या नाल्याच्या आत जाऊन रिपोर्टींग करत आहे. हा रिपोर्टर या नाल्यात पूर्णपणे बुडाला आहे. त्याचं फक्त डोकं या पाण्याबाहेर आहे. तेथे तो माईक घेऊन तेथील परिस्थीती किती गंभीर आहे हे दाखवत आहे. हा रिपोर्टर पूर्ण मानेपर्यंत बुडाला आहे, पण त्याच्या हातातून माईक काही सुटत नाही. तो या माईकवर बोलतच आहे. हे वाचा : धबधब्याजवळ ती सेल्फी काढायला गेली आणि एकामागून एक अख्खं कुटुंबच घेऊन गेली… वाचा काय आहे हे प्रकरण एवढंच नाही तर हा रिपोर्टर त्या नाल्यामधून हळूहळू लांब-लांब ढकलला जात आहे. परंतू तो तरी देखील आपलं रिपोर्टींग थांबवत नाही. तसेच हा रिपोर्टर ‘मला थोडं पोहता येतं आणि अल्लाह सगळं ठिक करेल’ असं देखील व्हिडीओमध्ये बोलत असल्याचं तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ समोर येताच, हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक आणि शेअर केलं आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली. ज्यावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.
हा व्हिडिओ अनुराग अमिताभ नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याला शेअर करताना त्याने लिहिले की, ‘‘Dangerous,deadly,killer #Pakistani #Reporting… पूरात अडकलेले पाकिस्तानी, न्यूज चॅनल, आर्मी आणि इमरान खान हे चार अनियंत्रित आहेत, काही करु शकता….’’ हे वाचा : वेगवान बाईकची कारला टक्कर, त्यानंतर जे घडलं ते थक्कं करणारं; घटनेचा Video Viral या व्हिडिओला आतापर्यंत 21 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ 27 ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आला आहे.