चहाप्रेमीसोबत धक्कादायक घटना
मुंबई 25 जानेवारी : इंटरनेटवर तुम्ही तुर्की आइस्क्रीमचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, यामध्ये ही आईस्क्रिम विकणारी मंडळी ही आईस्क्रिम घेणाऱ्याला सहजासहजी ते घेऊ देत नाही. ते तुमच्या हाताशी खेळतात आणि तुम्हाला आईस्क्रिम घेऊच देत नाही. यासंबंधीतचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असणार. या व्हिडीओमधील काही मंडळी आइस्क्रिम विक्रेत्याचं हे कृत्य मजेदार पद्धतीने घेतात. पण तरी देखील असे अनेक लोक आहेत, ज्यांना असं केल्याने खूप जास्त राग येतो. आइस्क्रिम विक्रेतेच्या अशा वागण्यामुळे अनेकांनी त्याला पुन्हा त्रास देण्याचे मार्ग शोधले. यासंदर्भात देखील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे ही पाहा : ‘कितने तेजस्वी लोग है’ भारतीयांचा जुगाड पाहून तुम्ही हेच म्हणाल, पाहा टॉप 9 फोटो सध्या सोशल मीडियावर यासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो चहाशी संबंधीत आहे. हा चहा विक्रेता देखील टर्किश आइस्क्रिम वाल्यासारखी चहा विकत असतो. पण तो असं करत असताना एका व्यक्तीसोबत एक छोटा अपघात घडतो. पण या अपघातात ही व्यक्ती जे काही घाबरते की बस्स…. या व्यक्तीला चहा पिणं इतकं महागात पडलंय की तो आता चहा पिताना हा दिवस कधीही विसरणार नाही. खरंतर टर्किश आइस्क्रिम वाल्याचा ट्रेंड कॉपी करत एका व्यक्तीने चहा विकण्यास सुरुवात केली. तो ज्या पद्धतीने चहा विकतो ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्याची ही चहा देण्याची पद्धत बहुतेकांना आवडली. इंस्टाग्रामवर दिसत असलेल्या क्लिपमध्ये, एक चायवाला लहान डिस्पोजेबल कप आणि गरम चहाचा भांडे हातात धरलेला दिसत आहे. तो त्याचा चहा एका छोट्या कपात ओततो आणि त्याच्या शेजारी बसलेल्या ग्राहकाला चहा देण्याचा बहाणा करतो. पण तो कप सहजासहजी त्या व्यक्तीच्या हाती लागू देत नाही. अखेर तो पहिला कप त्याच्या हातात देतो. ज्यानंतर ही खूर्चीवर बसलेली व्यक्ती तो चहाचा कप पुढच्या व्यक्तीला देतो आणि पुन्हा चहा विक्रेत्याकडून स्वत:साठी चहा घेऊ पाहातो. पण यावेळी चहा विक्रेता आपल्या या ट्रिकला नेक्ट लेवल घेऊन जातो आणि चहा एका कपात टाकताच त्या कपाच्या खालचा कप खूर्चीत बसलेल्या व्यक्तीवर फेकतो
हा चहाविक्रेता हे सगळं इतक्या चपळाईने करतो की त्याने नक्की चहा भरलेला कप फेकला दुसरं काही हे कळायला वेळच मिळत नाही. पण चहा वाल्याच्या अशा कृत्यामुळे खूर्चीत बसलेल्या व्यक्तीने चांगलाच धसका घेतला. ती व्यक्ती अशी काही घाबरली की थेट तिची खूर्चीच मोडली. हा व्हिडीओ फारच मनोरंजक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण या खूर्चीवरील व्यक्तीसाठी मात्र हे कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही.
हा व्हिडीओ लोकांकडून शेअर केला जात आहे, तसेच यावर नेटीझन्सकडून भरभरुन कमेंट्स देखील येत आहेत.