नवी दिल्ली 24 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत प्राण्यांचे नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका मांजरीला (Cat Video) भूकंप (Earthquake) येण्याआधीच याची भनक लागते आणि ती लगेचच पळ काढते. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत, कारण मागील काही काळात भूकंपानं ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर नुकसान झालं आहे. हे शिव मंदिर वैज्ञानिकांसाठीही कोडं, कधीच विझत नाही अग्निकुंडातील अखंड ज्वाळा! सध्या जो व्हिडिओ ट्विटरवर (Earthquake Video on Twitter) शेअर केला गेला आहे, त्यात दिसतं की कॅरल नावाची एक पांढऱ्या रंगाची मांजर एका टॉय फिशसोबत खेळत आहे. मात्र भूकंपाची भनक लागताच ही मांजर सावध होते. ती आपला खेळ थांबवून तिथून पळ काढते. मांजरीच्या मालकीणीनं सांगितलं, की मांजर शांत होऊन बाजूला गेल्यानंतर काही सेकंदातच भूकंपाचे झटके जाणवू लागले.
ही घटना खरी असल्याचं दाखवण्यासाठी महिलेनं भिंतीवर लावलेला एक फोटो शेअर केला, जो त्या ठिकाणी कोसळला जिथे कॅरल खेळत होती. मालकीण ब्रॉडी लँकेस्टरनं व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, कोणतीही मस्करी नाही. भूकंप तेव्हा सुरू झाला जेव्हा मी कॅरल आपल्या नव्या फ्लॉपी फिशसोबत खेळत असल्याचा व्हिडिओ शूट करत होते. तुम्ही पाहू शकता की मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असतानाच इथे काहीतरी घडत आहे. लग्नाआधी नवरीने सांगितली आपली ‘दिल की बात’; VIDEO पाहून नेटिझन्सही झाले इमोशनल सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांनी कॅरलच्या या सतर्कतेबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. आणखी एका यूजरनं यावर कमेंट करत सांगितलं, की मी बेडवर होतो आणि माझी पूर्ण रूम हालत होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी मांजराचं कौतुक केलं आहे.