व्हायरल व्हिडीओ
मुंबई 12 जानेवारी : रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. हे व्हिडीओ कधी रस्ते अपघाताचे असतात. तर कधी कोणत्याही गंमतीदार गोष्टींचे असतात. त्यात सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण झालं आहे. हा व्हिडीओ एक स्टंट व्हिडीओ आहे. जो पाहून तुमच्या हृदयाचे ठोके चुकतील. हो कारण यामधील कार चालक ज्या पद्धतीने कार चालवत आहे. ते पाहाणं फारच धोकादायक आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. आश्चर्याचीबाब म्हणजे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यावर कॉमेंट्री करताना दिसत आहे. हे ही पाहा : Video : हृदयाचा ठोका चुकवणारा अपघात; कित्येक मीटर उंच उडाली व्यक्ती आणि… या व्हिडीओमध्ये रस्त्यावरून एक ट्रक भरधाव वेगाने जात असल्याचे दिसत आहे आणि त्याच दरम्यान एक छोटी कारही ट्रकच्या बाजूने जात असल्याचे दिसून येत आहे. पण काही वेळातच ती गाडी ट्रकखाली जाते. पाहाताने हे दृश्य फारच धोकादायक वाटत आहे. कारण एक जरी लहान चुक झाली तर त्या कारचं काहीच खरं नव्हतं.
असं असलं तरी पुढे ही कार ट्रकच्या दुसऱ्या बाजून पुन्हा बाहेर येते. जे पाहून तुमच्या जीवात जीव येईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हा एक स्टंट आहे, जो फार प्रोफेशनल लोकांनी केला आहे. त्यामुळे कोणीही हा स्टंट करण्याची चूक करु नका.