JOIN US
मराठी बातम्या / Viral / शक्ती नाही युक्तीचा केला वापर! कारचालकाने सशस्त्र दरोडेखोरांना क्षणात पळवून लावलं; पाहा VIDEO

शक्ती नाही युक्तीचा केला वापर! कारचालकाने सशस्त्र दरोडेखोरांना क्षणात पळवून लावलं; पाहा VIDEO

बाईकवर स्वार होऊन, हातात बंदूक घेऊन छाती ताणून कारचालकाला लुटायला आलेले दरोडेखोर आल्या पावली जीव मुठीत धरून पळाले.

जाहिरात

कारचालकाने दरोडेखोरांना घडवली अद्दल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑगस्ट : रस्त्यावर गाडी थांबवून, गाडीत घुसून चालक आणि प्रवाशांची लूट करणारे दरोडेखोर. बऱ्याच फिल्ममध्ये तुम्ही हे दृश्य पाहिलं असेल. प्रत्यक्षातही अशा काही घटना घडतात ज्याची आपल्याला कल्पनाही नसते किंवा आपण विचारही केलेला नसतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दिवसाढवळ्या दोन व्यक्तींनी एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न केला. बाईकवरून येत दरोडेखोरांनी छाती ताणून कारच्या आत असलेल्या कारचालकावर बंदूक धरली. पण कारचालकाने या दरोडेखोरांचा चांगलाच बँड वाजवला आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावर धमकावणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांना कारचालकाने चांगलीच अद्दल घडवली आहे. कारचालकाशी पंगा घेणं या बाईकस्वारांना चांगलंच महागात पडलं आहे.  यापुढे हे दरोडेखोर असा दरोडा टाकण्याची हिंमत कदाचित पुन्हा कधीच करणार नाही. असा आयुष्यभराचा धडा त्यांना मिळाला आहे. हे वाचा -  आगीतून फुफाट्यात! तरुणाने 9 सेकंदात दोनदा स्वतःचाच ‘मृत्यू’ पाहिला; Shocking Video व्हिडीओत पाहू शकता रस्त्याच्या कडेला काही गाड्या उभ्या आहेत. काही गाड्या मधून जात आहे. तितक्या एका बाईकवरून तोंडा झाकून दोन व्यक्ती येतात. एक व्यक्ती बाईकवरून उतरून कारच्या खिडकीजवळ जातो आणि खिशातील बंदूक काढून कारचालकाला घाबरवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर दुसरा बाईकस्वार बाईक एका ठिकाणी पार्क करून त्या कारजवळ जातो. कारचालक क्षणाचाही विलंब न करता आपली कार पळवून घेऊन जातो.

संबंधित बातम्या

त्यानंतर बाईकवरून आलेले दरोडेखोरही घाईघाईत आपल्या बाईकवर बसतात आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करतात. ते जाणार तोच ज्या कालचालकाला काही वेळापूर्वी त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला तो आपली कार पुन्हा मागे घेऊन येतो. ज्या वेगाने तो तिथून निघून गेला त्याच वेगाने तो बॅक गिअर टाकून मागे येतो आणि कार थेट त्या दरोडेखोरांवर चढवतो. कारच्या धडकेत त्यांची बाईक पडते आणि चक्काचूर होते. पण ते वाचतात. बाईक तिथंच टाकून आपला जीव वाचवण्यासाठी ते पळतात. कारचालकाला बंदूक घेऊन लुटण्यासाठी छाती ताणून आलेले हे दरोडेखोर जीव मुठीत धरून तिथून पळून जातात. हे वाचा -  http://वाऱ्याच्या वेगाने आलेल्या कारने उडवल्या 3 गाड्या, बाईकस्वाराला चिरडलं; भयंकर अपघाताचा थरारक LIVE VIDEO Karma Clips ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 28 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कारचालकाने जी लगेच अॅक्शन घेतली त्यासाठी त्याचं कौतुक केलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या