नवी दिल्ली 06 मार्च : सोशल मीडियावर सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही हैराण करणारे. अनेक लोक तर काहीतरी वेगळं करण्याच्या नादात आपला जीवही धोक्यात घालतात. अनेकदा आपल्या या चुकीची मोठी शिक्षा त्यांना भोगावी लागते. सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Car Accident Video) झाला आहे. यात एक व्यक्ती अगदी स्वॅगमध्ये आपली गाडी चालवण्याच्या नादात चांगलाच अडचणीत सापडतो.
हा व्यक्ती रस्त्यावर समोरून मोठं वाहन आल्यावर बाजूला होऊन जागा देण्याऐवजी जबरदस्ती या वाहनाच्या बाजूने असलेल्या थोड्याशा जागेतून आपली गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र कदाचित याच्या परिणामाचा विचार त्याने केलेला नसतो. व्हायरल होणारा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की डोंगरावर असलेल्या अरूंद रस्त्यावर समोरून एक बस आली आहे. यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक होतो. अशात पुढे जाण्यासाठी चालक आपली गाडी बसच्या समोरून मागे घेण्याऐवजी स्टंट दाखवत अगदी कमी जागेतून बसच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न करू लागतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की कार चालक अगदी कमी जागेतून आपली कार एका बाजूला झुकवून तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हिडिओमध्ये दिसतं की अनेक प्रयत्नांनंतर कार चालक सुखरूपपणे बस ओलांडतो आणि कार बाहेर काढतो. मात्र कार एका बाजूला जास्त झुकल्यामुळे काही अंतर पुढे जाताच ती पलटी होते. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की कार एका बाजूवर पलटी झाल्यानंतरही आतील लोक दुसऱ्या बाजूने बाहेर निघत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बातमी देईपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर अनेकांनी लाईकही केला आहे.