किंग कोब्राचा व्हिडीओ
मुंबई, 08 जून : साप हा असा सरपटणारा प्राणी आहे. ज्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी देखील लोकांना घाफ फुटतो. ज्यामुळे लोक याच्यापासून लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. झाडा-झुडपात साप मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी किंवा गावच्या ठिकाणी सापाची भिती लोकांना जास्त असते. अशावेळी तुम्ही अनेकांना असं बोलताना एकलं असेल की दरवाजाजवळ मीठ टाकावं ज्यामुळे साप घरात येत नाही. यामागे त्यांची अशी मान्यता आहे की मीठामुळे सापाची त्वचा किंवा कातडी जळते, ज्यामुळे ते मीठाची रेषा पार करत नाहीत, ज्यामुळे आपल्या घरा साप शिरणार नाही. पण खरंच असं होतं का? साप खरंच मीठाची रेषा पार करु शकत नाहीत का की मग मीठाने त्यांना काहीही फरक पडत नाही? खरंच नागाला मारल्यावर नागीण बदला घेते? सापांसंबंधीत काही मान्यता आणि सत्य यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये सापाशी संबंधीत अनेक मान्यतांबद्दल खुलासा केला आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. या तरुणाने किंग कोब्रासोबत एक्प्रिमेंट करुन पाहिला आहे. विषारी आणि धोकादायक सापांचे आकर्षक रुप कधी पाहिलंय? पाहा जगातील सुंदर सापांचे PHOTO किंग कोब्रा हा जगातील सर्वात धोकादायक शिकारी मानला जातो. हा एक भक्षक आहे जो आपल्या भक्ष्याला चावल्यानंतर गिळतो. परंतु सापांबाबतही काही दावे मानवांमध्ये दीर्घकाळापासून केले जात आहेत. जसं साप दूध पितो किंवा तो पुंगीवर नाचतो. तसेच साप कधीही मिठाचे वर्तुळ ओलांडू शकत नाही. मात्र, या दाव्यांमागील सत्य काय आहे, हे ते या व्हिडीओत दाखवले आहे. साप मिठाचे वर्तुळ ओलांडू शकत नाही? एका प्रसिद्ध YouTuberने या दाव्यांची खरोखरच सत्यता सपासली आणि हे खरोखर घडते का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यूट्यूबर अमित शर्माने दोन सापांना मीठाने वेढून ठेवले होते. यानंतर जो निकाल समोर आला तो तुम्हाला चकित करेल. खरं तर, यासाठी आधी मिठाचे वर्तुळ बनवले गेले आणि मिठाच्या वर्तुळात दोन किंग कोब्रा सोडले गेले.
असे दिसून येईल की एक कोब्रा ताबडतोब मिठाच्या वर्तुळातून बाहेर आला तर दुसरा वर्तुळात राहिला. पण पुढे काही वेळाने तो दुसरा साप देखील बाहेर पडला. ज्यामुळे हे सिद्ध झाले की किंग कोब्रा सापाला घाबरत नाहीत. हा व्हिडिओ यूट्यूबर अमित शर्माने त्याच्या चॅनलवर अपलोड केला आहे, ज्याने आतापर्यंत एक कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये त्यांनी त्या दाव्यांचाही तपास केला ज्यामध्ये साप दूध पितात असे म्हटले आहे. हा दावाही खोटा ठरला कारण व्हिडीओमध्ये सापासमोर दूध असताना सापाने ते सोडले. या व्हिडीओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.