JOIN US
मराठी बातम्या / Viral / विनाकारण त्रास देणाऱ्या तरुणाला उंटाने अनोख्या पद्धतीने शिकवला धडा; हैराण करणारा VIDEO

विनाकारण त्रास देणाऱ्या तरुणाला उंटाने अनोख्या पद्धतीने शिकवला धडा; हैराण करणारा VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Viral Video of Camel) पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये दिसतं, की उंटाने या व्यक्तीला अद्दल घडवली की विनाकारण त्रास देणं चुकीचं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 17 जानेवारी : सध्या एक अतिशय अनोखा व्हिडिओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. यात दिसतं की एक व्यक्ती एका प्राण्याची खोड काढण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक उंट गल्लीतून जात आहे. इतक्यात एक व्यक्ती त्याच्या शेजारून जावू लागतो. गर्दीमध्ये उंट हळूहळू चालू लागताच हा व्यक्ती विनाकारण उंटाच्या पायावर वार करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याला लगेचच आपल्या कर्माचं फळ मिळतं. उंटाला लगेचच या व्यक्तीचा उद्देश समजला आणि त्याने या व्यक्तीला लाथ मारून दूर पळवलं.

काय सांगता! चक्क माकडाने उडवली पतंग; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यावर विश्वास

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ (Viral Video of Camel) पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडिओमध्ये दिसतं, की उंटाने या व्यक्तीला अद्दल घडवली की विनाकारण त्रास देणं चुकीचं आहे. मग तो माणूस असो किंवा प्राणी. या व्यक्तीला वाटलंही नसेल की उंट त्याला अशा पद्धतीने अद्दल घडवू शकतो. मात्र, उंटाची जबरदस्त लाथ बसताच हा व्यक्ती थेट खाली कोसळला. यानंतर शेजारी उभा असलेले इतर लोक घाबरून लगेचच दूर पळाले.

संबंधित बातम्या

हा व्यक्ती मस्ती करण्यासाठी उंटाला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला याची अजिबातही कल्पना नव्हती की चुकीच्या कामाचं फळ आपल्याला इतक्या लवकर मिळेल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

VIDEO : जेव्हा सिंहाच्या तावडीतून मित्रांनी वाचवलं;म्हैशीच्या कळपाने दाखवला इंगा

हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला आहे. व्हिडिओला त्यांनी कर्मा असं कॅप्शन दिलं आहे. हे एका शब्दाचं कॅप्शन शॉर्ट क्लिपबद्दल सर्व काही सांगून जातं. हा व्हिडिओ आतापर्यंत 78 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. 5 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या