JOIN US
मराठी बातम्या / Viral / सभा सुरू असतानाच भडकलेले बैल गर्दीत शिरले; नागरिकांची तारांबळ, पुढे काय घडलं बघा, VIDEO

सभा सुरू असतानाच भडकलेले बैल गर्दीत शिरले; नागरिकांची तारांबळ, पुढे काय घडलं बघा, VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं, की बैलगाडीमध्ये बसून काही लोक चाललेले आहेत. याचवेळी तिथे आम आदमी पार्टीची सभा सुरू आहे. सभेतील माईकचा आवाज ऐकून हे बैल भडकले अन् मग सगळ्यांचीच तारांबळ उडाली. (Bull Attack Video)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद 29 ऑगस्ट : मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी अनेकदा चेंगराचेंगरी झाल्याच्या किंवा गोंधळ उडाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता राजकीय पक्षाच्या सभेतच मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चक्क बैलाने सभेदरम्यान चांगलाच गोंधळ उडवला. गुजरातमधील या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. एक डुलकी आणि कोट्यवधींचं नुकसान! मिनी क्रेनमध्ये झोपणाऱ्या चालकासोबत काय घडलं, पाहा Video गुजरातच्या मंगरोल याठिकाणी आम आदमी पार्टीची सभा सुरू होती. या सभेसाठी माईक लावण्यात आला होता. सभेमध्ये माईक असणं यात काही विशेष किंवा नवीन नाही. मात्र, त्याठिकाणी असलेल्या बैलांना कदाचित हे अजिबातच आवडलं नाही. माईकचा आवाज ऐकताच हा बैल चिडला आणि मग पुढे जे काही झालं ते तुम्ही व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये दिसतं, की बैलगाडीमध्ये बसून काही लोक चाललेले आहेत. याचवेळी तिथे आम आदमी पार्टीची सभा सुरू आहे. सभेतील माईकचा आवाज ऐकून हे बैल भडकले अन् मग सगळ्यांचीच तारांबळ उडाली. हे भडकलेले बैल सैरावैरा धावू लागले आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करू लागले. वेगवान बाईकची कारला टक्कर, त्यानंतर जे घडलं ते थक्कं करणारं; घटनेचा Video Viral बैलांचं हे रौद्ररूप पाहून सभेसाठी आलेले लोकही घाबरले आणि उठून पळू लागले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या भडकलेल्या बैलांनी सभेसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्या आपल्या शिंगांनी धडक देत आणि पायाने तुडवत तोडून टाकल्या. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झालं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या