JOIN US
मराठी बातम्या / Viral / गेटमधून बाहेर येताच वळूने शिंगावर उचललं; मग जमिनीवर आपटून पायांनी तुडवलं, थरारक VIDEO

गेटमधून बाहेर येताच वळूने शिंगावर उचललं; मग जमिनीवर आपटून पायांनी तुडवलं, थरारक VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक वळू रस्त्यावर उभा असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, एक व्यक्ती घराच्या गेटमधून बाहेर पडत असल्याचं दिसतं. इतक्यात हा वळू या व्यक्तीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने पुढे सरकतो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 मे : आपल्या आजूबाजूला असे अनेक प्राणी आहेत जे हल्ला करून भरपूर नुकसान पोहोचवू शकतात. जेव्हा हे प्राणी चवताळतात तेव्हा ते माणसांसाठीही खूप धोकादायक ठरू शकतात. या प्राण्यांमध्ये वळूचाही समावेश आहे, ज्याच्या रागाचा सामना करणं सामान्य बाब नाही. सध्या एका वळूशी संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video of Bull Attack on a Man) होत आहे. बहुतेकांना हवाहवासा वाटतोय हा चोर; चोरीचा हा VIDEO चोरट्याचं होतंय कौतुक व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक वळू रस्त्यावर उभा असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, एक व्यक्ती घराच्या गेटमधून बाहेर पडत असल्याचं दिसतं. इतक्यात हा वळू या व्यक्तीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने पुढे सरकतो. हा व्यक्ती गेटबाहेर उभा असलेल्या स्कूटीकडे जाताच वळू त्याच्यावर हल्ला करू लागतो. वळू आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून या व्यक्तीला समजतं की तो आपल्यावर हल्ला करू शकतो. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. वळू त्या व्यक्तीवर हल्ला करून त्याला खाली पाडतो. यानंतर त्या व्यक्तीला आपल्या शिंगावर उचलतो आणि जमिनीवर आपटतो. एवढ्यावरच तो थांबत नाही, तर यानंतर त्याला जमिनीवर पाडून त्याच्या अंगावर चढूनही हल्ला करतो. आता वळूने हा नेमका कशाचा बदला घेतला की याला आणखी काही दुसरं कारण होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

संबंधित बातम्या

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Shocking Video Viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की वळू या व्यक्तीवर हल्ला करून त्याला रस्त्यावर ओढत नेतो. यानंतर आपल्या शिंगांनी आणि पायाने त्याच्यावर हल्ला करतो. मात्र यादरम्यान या व्यक्तीची मदत करण्यासाठी तिथे इतर कोणी उपस्थितही नव्हतं. भरधाव कारच्या धडकेत ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे आणि ड्रायव्हर…; अपघाताचा धडकी भरवणारा VIDEO हा व्यक्ती आपला जीव वाचवण्याचा भरपूर प्रयत्न करत राहिला, मात्र वळूपुढे स्वतःचा बचाव करणं त्याला शक्य झालं नाही. सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 70 हजारहून अधिकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या