नवी दिल्ली 25 एप्रिल : सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. लग्नाच्या सिझनमध्ये व्हायरल होणारे व्हिडिओ तर लोकांच्या विशेष पसंतीस उतरतात. सध्या एका लग्नातील असाच एक मजेशीर व्हिडिओ (Funny Wedding Video) व्हायरल होत आहे, ज्यामधील नवरीबाईचे नखरे लोकांचं मन जिंकत आहेत. बेस्ट फ्रेंडसोबत लग्न ठरलं अन् नवरीच्या चेहऱ्यावरील भावच बदलला, Wedding Video Viral मजेशीर व्हिडिओमध्ये, एक नवरीबाई आपल्या लग्नात इतकी आनंदी दिसत आहे की जणू ती अनेक वर्षांपासून वराच्या ‘कुबूल है’ची वाट पाहत बसली होती. नवरदेव ‘कुबूल है’ बोलताच नवरी आनंदाने नाचू लागते (Bride Started Dancing at Wedding Hall). इतकंच नाही तर पाहुण्यांसमोरच ती नवरदेवाच्या गळ्यात हात घालून त्याला किसही करते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरीबाई लग्नानंतर इतकी आनंदी दिसत आहे की ती मंडपातच उड्या मारू लागते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आपल्या नवरदेवासोबत लग्नासाठी बसली आहे. मौलवी नवरदेवाला विचारतात की लग्न मान्य आहे का? नवरदेवाने हो म्हणताच नवरी आनंदाने वेडी झाली. यानंतर ती आपला आनंद व्यक्त करण्यासाठी तिच्या जागेवरून उड्या मारू लागते. नवरीचा आनंद पाहून सर्व पाहुणे हसायला लागतात. VIDEO: फोनवर बोलत रस्त्यावरुन चाललेली महिला मॅनहोलमध्ये पडली; 18 सेकंदाचा थरार CCTV मध्ये कैद नवरी आनंदाने फक्त नाचतच नाही तर तर नवरदेवाला किसही करते. तिचा हा आनंद पाहून तिथे उपस्थित सगळे पाहुणे जोरजोरात हसू लागतात आणि याचा व्हिडिओ रेकॉर्ड करतात. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर romantic_cute_prince नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये नवरीबाई ज्या प्रकारे आनंदी दिसत आहे, ते क्वचितच पाहायला मिळतं. या क्यूट व्हिडिओने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.