JOIN US
मराठी बातम्या / Viral / स्टेजवरच अचानक बदलला नवरीचा मूड; मग जे केलं ते पाहून नवरदेवही लाजला, VIDEO

स्टेजवरच अचानक बदलला नवरीचा मूड; मग जे केलं ते पाहून नवरदेवही लाजला, VIDEO

नवरी आनंदात असं काही करते ज्याची नवरदेवाने कल्पनाही केलेली नसते. नवरी बॉलिवूडच्या ‘रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा…’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 05 फेब्रुवारी : जवळपास प्रत्येकाची आपल्या लग्नात अनोखं काहीतरी करण्याची इच्छा असते. जेणेकरून हा खास दिवस नेहमी लक्षात राहावा. लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेव यांच्याकडेच सगळ्या पाहुण्यांचं लक्ष असतं. त्यामुळे त्यांची प्रत्येक हालचालही लोकांच्या नजरेत येते. लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकजण लग्नातच डान्स (Dance Video) करायला सुरुवात कऱण्याचा पर्याय निवडतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही (Viral Video of Bride) काहीसं असंच पाहायला मिळतं. यात नवरीनं असं काही केलं की पाहुण्यांसोबत नवरदेवही थक्क होऊन पाहातच राहिला. नवरीनं अशा वेळी सर्वांसमोर अचानक डान्स करायला सुरुवात केली, जेव्हा सगळे तिच्याकडेच पाहात होते. VIDEO - मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून लाजली नवरी; नेटिझन्स म्हणाले, ‘काम की चीज’ सहसा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Wedding Video) पाहायला मिळतं, की लग्नात वरमाळेच्या आधी नवरदेव स्टेजवर उभा असतो. इतक्यात नवरी नाचतच स्टेजवर एन्ट्री करते. मात्र, सध्या समोर आलेला व्हिडिओ असा नाही. यात नवरी आनंदात असं काही करते ज्याची नवरदेवाने कल्पनाही केलेली नसते. नवरी बॉलिवूडच्या ‘रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा…’ या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात करते.

संबंधित बातम्या

सगळ्यात थक्क करणारी बाब म्हणजे हे सगळं पाहून नवरदेव आश्चर्यचकीत झाला आणि हसत नवरीकडे पाहात राहिला. नवरदेवाने नवरीसोबत डान्सही नाही केला. मात्र, नवरी आपल्याच नादात मग्न होती. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नवरीचं कौतुक वाटेल.

VIDEO - …अन् जीवाची पर्वा न करता विना कपडे तरुणाने गोठलेल्या तलावात उडी मारली

नवरीने आपला आनंद व्यक्त करण्यासाठी लग्नात हा खास डान्स केला. यामुळे नवरी आणि नवरदेव दोघांसाठीही हा क्षण अतिशय अविस्मरणीय ठरला. इन्स्टाग्रामवर अंशुल चव्हाण नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. आतापर्यंत 73 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या