JOIN US
मराठी बातम्या / Viral / एका ग्लासमुळे फुटलं नवरदेवाचं बिंग, लग्नातच दिसलं त्याचं खरं रूप; VIDEO VIRAL

एका ग्लासमुळे फुटलं नवरदेवाचं बिंग, लग्नातच दिसलं त्याचं खरं रूप; VIDEO VIRAL

नवरीसमोर नवरदेवाची पोलखोल झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 सप्टेंबर : लग्न (Wedding Video) म्हटलं की डान्स, मजा-मस्ती आणि नवरा-नवरीमधील (Bride Groom Video) रोमँटिक क्षण. पण लग्नात असं काही अचानक घडतं ज्याचा विचारही आपण केलेला नसतो. कधी हे शॉकिंग असतं तर कधी फनी. अशाच एका लग्नातील मजेशीर क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. लग्नातील एका परंपरा निभावताना नवरदेवाने असं काही केलं की लग्नातच त्याचं बिंग फुटलं आहे. नवरीसमोर नवरदेवाची पोलखोल झाली आहे. एका छोट्याशा चुकीमुळे त्याचा मोठा राज उलगडतो.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांच्या शेजारी बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला काही नातेवाईकही आहेत. नवरा-नवरीच्या हातात दुधाचा ग्लास आहे. दोघंही दूध पितात. त्यानंतर दुधाचा हा ग्लास त्या दोघांना आपसात बदलायचा असतो. असं केल्याने त्यांच्यातील प्रेम वाढेल असं मानलं जातं. हे वाचा -  लग्नातच नवरीबाईला ‘जोर का झटका’! नवरदेवाचं ‘ते’ कृत्य पाहून उडालीच; VIDEO VIRAL नवरी आपल्या ग्लासमधील दूध पिऊन झाल्यानंतर ग्लास नवऱ्याला द्यायला जाते. नवरीने ग्लास पुढे करताच नवरा तिच्या ग्लासला आपला ग्लास टेकवतो आणि चीअर्स करतो. जणू काही  मित्रांसोबत दारूची पार्टीच करायला बसला आहे. हे पाहिल्यानंतर सर्वजण हसू लागतात. नवरीलाही हसू आवरत नाही. हे वाचा -  माकडासोबत सेल्फी पडला महागात! तरुणावर कसा खतरनाक हल्ला केला पाहा VIDEO यावरून नवरदेवाला दारू प्यायची सवय आहे, हे स्पष्ट होतं आणि लग्नातील त्याच्या या एका छोट्याशा चुकीमुळे त्याचं बिंग फुटतं. हा व्हिडीओ पाहून अशाच मजेशीर कमेंट नेटिझन्स देत आहेत. नवरदेव आपली बॅचलर पार्टी विसरला नाही, लग्नानंतर आता नवरदेवाचं काही खऱं नाही, अशा प्रतिक्रिया काही युझर्सनी दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या