अपघातानंतरही तरुणांची फायटिंग.
गाझियाबाद, 22 सप्टेंबर : काही झालं तर एकमेकांची कॉलर न सोडणारे, एकमेकांशी फाइट करत राहणारे हिरो आणि व्हिलन तुम्ही फिल्ममध्ये पाहिलेच आहेत. असाच फिल्मी स्टाइल राडा प्रत्यक्षातही रस्त्यावर पाहायला मिळाला. भररस्त्यात फायटिंग करणाऱ्या तरुणांना भरधाव कारने हवेत उडवलं पण तरुणांनी एकमेकांना सोडलं नाही. भयंकर अपघातानंतरही तरुण एकमेकांसोबत फायटिंग करत राहिले. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील ही घटना आहे. वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यात तरुण एकमेकांशी भिडले. तरुणांनी रस्त्यात अक्षरशः राडा घातला. त्याचवेळी एक गाडी भरधाव वेगाने आली. तेव्हा ज्या तरुणांचं लक्ष गेलं ते पळत सुटले. पण ज्यांचं लक्ष ते तरुण एकमेकांशी भांडण्यातच दंग होते. तसा तरुणांनी भरलेला रस्ता मोकळा झाला होता त्यामुळे कार पटकन पुढे गेली आणि ती थेट लक्ष नसलेल्या या तरुणांच्या अंगावर चढली. हे वाचा - Shocking Video - बंद गाडीसमोर चुकूनही उभं राहू नका; भयंकर दृश्य CCTV मध्ये कैद व्हिडीओत पाहू शकता कारने दोन्ही तरुणांना धडक दिली. कारच्या धडकेत दोघंही बॉलसारखे हवेत उडाले. त्यानंतर गाडी आणि जमिनीवर पडले. अगदी कारच्या खालीच गेले होते. पण त्याचवेळी कारचालकाने कार थांबवली आणि सुदैवाने ते चिरडले गेले नाही. आता इतक्या मोठ्या अपघातानंतर शारीरिक दुखापत झाली नसली तरी मानसिक धक्का बसतोच की नाही. पण हे तरुण मात्र अपघातानंतर उठले आणि पुन्हा एकमेकांशी लढू लागले. आधी एकमेकाशी लढणाऱ्या दोन तरुणांमध्ये तिसरा तरुण आला आणि तो एका तरुणाला मारहाण करू लागला.
तिथं उपस्थित असलेल्यांनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. जो तुफान व्हायरल होतो आहे.
माहितीनुसार हे तरुण कॉलेजचे विद्यार्थी आहे. मिसुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापैकी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर कारचालकाविरोधातही कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.