चिडलेल्या प्रेयसीने केलं भयानक कृत्य
नवी दिल्ली, 23 जून : प्रेमात लोक काहीही करायला तयार असतात. याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. ज्यामध्ये प्रेयसी आणि प्रियकरानं एकमेकांसाठी जीवही दिल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसते. नुकतीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये तरुणीने बॉयफ्रेंडचं लग्न झालं म्हणून धक्कादायक पाऊल उचललं. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. प्रियकराचं लग्न झालं म्हणून दुःखी तरुणीनं रेल्वेसमोर जाऊन जीवन संपवले. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वालियरमधील आहे. ही घटना समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली.
आठवडाभरापूर्वी मध्य प्रदेशातील जुना कॅन्टोन्मेंट परिसरात रेल्वे रुळावर मुलीचा मृतदेह आढळून आला होता. विकृत रूपामुळे मृतदेहाची ओळख पटू न शकल्याने तो मृतदेह घरात ठेवण्यात आला. शहरातील गिरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमली नाका सिकंदर कंपू येथील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय तरुणीचा 13 जून रोजी दुपारी जुना छावणी येथील रेल्वे रुळावर रेल्वे रूळावरून पडून मृत्यू झाला होता. तरुणीचा मृतदेह आढळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी ही माहिती सर्व पोलीस ठाण्यांना दिल्यावर बेपत्ता मुलीच्या नातेवाईकांनी पीएम हाऊस गाठून तिची ओळख पटवली. Viral Video : कॉलेज कॅंटीनच्या जेवणात आढळलं उंदराचं डोकं, Video व्हायरल होताच उडाली खळबळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तेव्हाच मुलीच्या खोलीत तिच्या पुस्तकातून सुसाईड नोट सापडली. सुसाईड नोटमध्ये तरुणीने प्रियकराने फसवणूक केल्याचे लिहिले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली. सुसाईड नोटमध्ये तिनं लिहिलं होतं की, ती आणि घराशेजारील दीपक पाच वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. तो लग्नाचं आश्वासन देऊन तिचं शोषण करत होता. मात्र त्याने दुसरं लग्न करुन तिची फसवणूक केली. ती दीपक शिवाय कोणाशी लग्न करु शकत नाही म्हणून ती मरत आहे. सुसाईड नोटच्या आधारे प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये प्रियकर प्रेयसीच्या फसवणूकीमुळे काहीतरी भयानक, धक्कादायक घडतं.