नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : भारतात लवकरच लग्नाचा सीझन (Wedding Season 2021) सुरू होईल. अनेक दिवसांपासून बंद असलेले लग्नसोहळ्याचे कार्यक्रम आता सुरू होतील. अशात तुम्हालाही तुमच्या घराजवळून जाणाऱ्या वराती पाहायला मिळतील. लग्नाचा सीझन सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील व्हिडिओ शेअर होऊ लागले आहेत. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर (Funny Wedding Viral Video) असतात तर काही भावुक करणारे. असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आंधळा असूनही शेफनं अनोख्या पद्धतीनं कापली काकडी; VIDEO पाहून घालाल तोंडात बोटं इन्स्टाग्रामपासून फेसबुकपर्यंत वरातीचा हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये एका गल्लीतून वरात निघताना दिसते. यात अनेक गाड्यांमध्ये वराती बसलेले असून ते डान्स करताना आणि गाणं गाताना दिसतात. व्हिडिओमध्ये वराती इमरान खानच्या बेवफा निकली हाए तू गाण्यावर डान्स करत गल्लीतून जातात दिसतात. यादरम्यान नवरदेवाच्या मित्रांना भरपूर डान्स केला. असं समोर आलं आहे की ही वरात नवरदेवाच्या आधीच्या गर्लफ्रेंडच्या दारातून गेली आहे.
व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये हे स्पष्ट होत नाही की तो नेमका कुठे शूट केला गेला आहे आणि कधीचा आहे. मात्र कॅप्शनमधून हे समजतं की प्रेमात धोका मिळालेल्या या तरुणाने आपल्या लग्नाची वरात एक्स गर्लफ्रेंडच्या दारातून काढली आहे. हा व्हिडिओ भरपूर जुना आहे. अनेक वर्षांपासून हा शेअर केला जातो. लग्नाचा सीझन जवळ आल्याने हा व्हिडिओ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘अखियां मिलाऊं कभी..’ गाण्यावर एअर होस्टेसचे जोरदार ठुमके; VIDEO चा धुमाकूळ लोकांना आपल्या धोका दिलेल्या प्रेयसीला धडा शिकवण्याची या तरुणाची पद्धत फारच आवडत आहे. वरातीही जोरजोराने बेवफा निकली हाए तू गाणं गाताना दिसतात. सोबतच यावर जोरदार परफॉर्मन्सही करतात. हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात आहे. सोबतच अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.