असा सेल्फी घेणं पडलं महागात.
मुंबई, 23 नोव्हेंबर : सेल्फी काढायला कुणाला आवडत नाही पण काही लोकांना सेल्फी इतकं वेड असतं की ते कुठेही सेल्फी काढतात. असाच एक सेल्फी घेणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या तरुणाने अशा ठिकाणी असा सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला की त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. सेल्फीची हौस कित्येकांना महागात पडल्याची बरीच प्रकरणं आहेत. सेल्फीच्या नादात कित्येक जण आपला जीव धोक्यात टाकतात. या व्हिडीओतील तरुणानेही तेच केलं. तरुणासोबत जे घडलं ते पाहून तुम्हाला धडकी भरेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, दोन तरुण हातात मोबाईल घेऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही नीट पाहिलं तर ते रेल्वे रूळांजवळ उभे आहेत. इतक्या त्या रूळांवर एक ट्रेन येते. हे वाचा - लोको पायलटच्या मागून भरधाव वेगाने आली ट्रेन; पाहताच दुसऱ्याने वाचवण्यासाठी उडी मारली आणि… ट्रेनच्या समोर असलेला तरुण ट्रेनला पाहून रूळांपासून दूर होतो. पण ट्रेन येणार त्या दिशेने पाठ करून उभा राहिलेला तरुण मात्र तिथंच उभा राहतो. त्या तरुणाला काही कळायच्या आतच ती ट्रेन त्याला धडकते. तेव्हा आपल्या काळजाचाही ठोका चुकतो. ट्रेन धडकताच त्याच्या हातातील मोबाईल दूरवर फेकला जातो आणि तो खाली पडून फुटतो. तरुणही जमिनीवर कोसळतो. त्याच्या मदतीलाही कुणी जात नाही. तो स्वतःच कसाबसा उठतो. पण त्याला आपला हात बधीर झाल्यासारखा वाटतो. तो आपला हात हलवून बघतो, त्यानंतर तिथं असलेल्या लोकांनाही आपला हात दाखवतो. ट्रेनची धडक इतक्या वेगाने बसली की त्याचा हात नक्कीच मोडला असावा. हे वाचा - मित्राच्या लग्नात इतका नाचला की मंडपातच तरुणाचा झाला धक्कादायक शेवट; पाहा Live Video हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. gieddeeandgiedde इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
सुदैवाने तरुणाचं जीवावर बेतणार होतं ते हातावर बेतलं. पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही मात्र सावध व्हा. अशा ठिकाणी सेल्फी घेऊ नका.