तरुणाचं संतापजनक कृत्य
नवी दिल्ली, 19 मे : आजकाल लोक माणसांपेक्षा अधिक प्रेम पाळीव प्राण्यांवर करताना दिसतात. प्रत्येक घरात तुम्हाला एक ना एक तरी पाळीव प्राणी हे सापडेलच. एवढंच नाही तर रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांवर पण अनेकदा लोक प्रेम दाखवतात. त्यांना कुरवाळतात, खायला देतात. याउलट असेही क्रूर लोक आहेत जे पाळीव प्राण्यांना त्रास देतात. कारण नसताना त्यांना त्रास देतात. अशा अनेक घटना समोर आल्या असून यामध्ये आणखी एक घटनेची भर पडली आहे. एका व्यक्तीने रस्त्यावरील कुत्र्याला हानी पोहोचवल्याचा प्रकास समोर आला आहे. एवढंच नाही तर पुढे त्यालाही याची शिक्षा भोगावी लागली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये समोरून तीन मुले रस्त्याने येताना दिसत आहेत. त्यांच्या समोरून कुत्र्याचं पिल्लूही चालताना दिसतंय. पुढच्याच क्षणी एक मुलगा त्या पिल्लाला त्याच्या कानाजवळ उचलून घेतो आणि मग हवेत झोकावून रस्त्यावर फेकतो. त्यानंतर पुढे एक तरुण त्याला या कृत्याबद्दल चांगलीच शिक्षा देतो. त्याला काठीने चोप देतो.
ट्विटरवर @gharkekalesh या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शन दिले आहे की, कुत्र्याला फेकल्यानंतर न्यूटनचा तिसरा गतीचा नियम तरुणावर लागू झाला. 23 सेकंदाची ही क्लिप बातमी लिहिपर्यंत 38 हजार वेळा पाहिली गेली आहे. पोस्टवर अनेक कमेंटदेखील येताना दिसत आहे. दरम्यान, अशा क्रुर कृत्याविषयी लोक संताप व्यक्त करत आहेत. त्या तरुणावर रागाचा वर्षाव करत आहेत. यापूर्वीही अशी विचित्र, धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. ज्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली.