मुंबई 13 सप्टेंबर : आपल्या समोर सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ समोर येतात, जे आपलं मनोरंजन करतात. म्हणून तर एकदा का आपण सोशल मीडियावर आलो की मग तेथे आपला तासनतास कसा निघून जातो हे आपलंच आपल्याला कळत नाही. येथे आपल्याला मनोरंजक किंवा क्यूट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्ही फारच भावूक व्हाल. लहान मुलं ही खूप मस्तीखोर असतात हे तर आपल्याला माहित आहे, ज्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी आई-वडिल तसेच शिक्षकांना वेगवेगळ्या युक्त्या वापराव्या लागतात. ही लहान मुलं बऱ्याचदा अशा काही चुका करतात की, त्यांना नीट सांगितलं तरी देखील कळत नाही. अशावेळी वेगळ्या प्रकारे त्यांना त्या सांगाव्या लागतात आणि याच संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका आणि लहान मुलगा एकमेकांशा बोलताना दिसत आहेत. तर या दोघांच्यापाठी शाळेतील दुसरे विद्यार्थी बसलेले तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ शिक्षिका आणि या लहान मुलाच्या क्यूट अशा भांडणाचा आहे. हे वाचा : राष्ट्रगीतामध्ये लपलाय भारताचा पूर्ण नकाशा, या ओळीबद्दल असा विचार तुम्ही कधीच केला नसावा; पाहा व्हिडीओ या व्हिडीओमध्ये शिक्षिका त्या लहान मुलावर रागवली आहे आणि त्याच्यासोबत आता ती बोलणार नाही असं देखील सांगत आहे. त्याचवेळी हा मुलगा मी अशी चूक करणार नाही असं या शिक्षिकेला सांगतो आणि तिच्या गालावर प्रेमाने किस देखील करतो. हे वाचा : विद्येच्या मंदिरातील धक्कादायक VIDEO; प्रिन्सिपलने शाळेत विद्यार्थ्यांना जबरदस्ती करायला लावलं असं काम हा मुलगा आपल्या क्यूटनेसने आपल्या शिक्षिकेला पूर्णपणे मनवण्याचा प्रयत्न करतो. परंतू ती त्याच्यावर रागावून बसलेली आहे. या व्हिडीओने अनेकांची मन जिंकली आहेत.
हा व्हिडीओ छपरा जिला नावाच्या अकाउंटवरुन ट्वीटरवर शेअर करण्यात आली आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.