JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणाने भररस्त्यात तरुणींना करायला लावलं असं काम; VIDEO पाहून तुम्हीही शॉक व्हाल

तरुणाने भररस्त्यात तरुणींना करायला लावलं असं काम; VIDEO पाहून तुम्हीही शॉक व्हाल

आपल्यासोबत हे काय घडतं आहे हे तरुणींनाही समजत नव्हतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social media) बरेच व्हिडीओ व्हायरल (Viral video) होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर, काही भावुक काही धक्कादायक असतात. सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणाने भररस्त्यात तरुणींना असं काही करायला लावलं आहे जे पाहून सुरुवातीला तुम्हीही शॉक व्हाल पण नंतर मात्र तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हिडीओत पाहू शकता दोन तरुणी एकमेकांशी बोलत उभ्या आहेत. त्यांच्याजवळ एक तरुण येतो आणि तो त्या तरुणींच्या हातात एक भाडं देतो. त्यानंतर पुढे जे घडतं ते पाहून तुम्हाला हसू बिलकुल आवरणार नाही.

संबंधित बातम्या

या तरुणी रस्त्यावरील एका स्टॉलवर मोमोज खाण्यासाठी थांबलेल्या आहेत. त्याचवेळी त्यांच्याशेजारी असलेला एक तरुण शूझची लेस बांधण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातात भांडं पकडायला देतो. त्यानंतर खाली वाकून तो आपल्या बुटांची लेस बांधू लागतो. त्याचवेळी ती तरुणी तिच्यासोबत असलेल्या तरुणीच्या हातात ते भांडं देते. हे वाचा -  बापरे! चक्क बिबट्यासोबतच फोटो काढायला गेला आणि…; सर्वात खतरनाक सेल्फीचा VIDEO तो तरुण कधी बुटांची लेस बांधून उठतो, याची वाट पाहत असतात. थोड्या वेळात एक तरुण येतो आणि तरुणींच्या हातातील भांड्यात एक पैशांचं नाणं टाकतो. तरुणी त्याच्याकडे पाहतच राहतात तोवर पुढे आणखी काही तरुणही तसंच करतात. काय सुरू आहे हे त्यांना समजतच नाही. मग त्यांच्या हातात भांड देऊन शूजची लेस बांधायला खाली वाकलेला तरुण उठून उभा राहतो आणि त्यांच्याकडे पाहून हसू लागतो. तेव्हा तरुणींना हे नेमकं काय प्रकरण आहे ते समजतं. त्या तरुणींसोबत प्रँक केला जात होता. जेव्हा त्यांना याबाबत समजतं तेव्हा त्यांनाही हसू आवरत नाही. हे वाचा -  VIDEO - Chaka chak आजीसमोर सारा काहीच नाही; चकाचक गाण्यावर लगावले जबरदस्त ठुमके bhutni_ke_memes  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या