JOIN US
मराठी बातम्या / Viral / संताप! सायकलवरुन पडला तर मागून येणाऱ्या कारने अंगावर घातली गाडी; 6 कोटींवेळा पाहिला गेला VIDEO

संताप! सायकलवरुन पडला तर मागून येणाऱ्या कारने अंगावर घातली गाडी; 6 कोटींवेळा पाहिला गेला VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत 6 कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Accident Video Viral: रस्त्यावर चालत असताना अनेकदा लोक इतक्या घाईत असतात की, त्यामुळे ते स्वत:चं टेन्शन वाढवतात आणि समोरच्यालाही संकटात टाकतात. याच कारणामुळे भररस्त्यात लोकांमध्ये वाद सुरू होता. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती सायकलवरुन जात आहे, दरम्यान मागून येणारी एक गाडी त्याला धडक देते. सायकलवरुन पडलेल्या व्यक्तीवर हल्ला व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरुन काही लोक सायकलीवरुन जात होते. मात्र दरम्यान मागून एक चार चाकी वाहनाने एका सायकलला धडक दिली. हे पाहून सायकल स्वाराच्या सोबत असलेले मित्र चिडतात आणि जोर-जोरात ओरडू लागतात. तेव्हा गाडी चालक मागून सायकल स्वाराच्या वरुन आपली गाडी चढवण्याचा प्रयत्न करतो. मात्र सुदैवाने सायकल स्वार या अपघातात बचावतो. हे ही वाचा- भंगार विक्रेत्याची भन्नाट आयडिया, भारतीय सैन्याकडून 6 कंडम हेलिकॉप्टरची खरेदी 6 कोटींवेळा पाहिला गेला हा व्हिडीओ

संबंधित बातम्या

कार चालक अत्यंत जवळून गाडी नेतो आणि त्यानंतर फरार होतो. सायकल स्वार थोडक्यात बचावला, असं दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 23 लाख लोकांनी लाइक केला. तर 6 कोटी लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या