JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'हा तर भारतीय Iron Man'; मुलाने हाताने केले दगडाचे 2 तुकडे, VIDEO पाहून नेटकरी अवाक

'हा तर भारतीय Iron Man'; मुलाने हाताने केले दगडाचे 2 तुकडे, VIDEO पाहून नेटकरी अवाक

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की अनेक लोक एकत्र बसलेले आहेत, तेवढ्यात एक व्यक्ती येऊन तिथे बसलेल्या व्यक्तीकडून दोन दगड घेतो आणि मग तो जमिनीवर बसतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 20 मार्च : स्टंटचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आजकाल अगदी बहुतेकांमध्ये स्टंटचं क्रेज पाहायला मिळतं. स्टंट व्हिडिओ (Stunt Viral Video) बनवण्यासाठी काही लोक तर जीवाची पर्वाही करत नाहीत. अशा स्टंटवेळी थोडी चूक झाली तरी कोणतीही मोठी घटना घडू शकते. मात्र असेही अनेक लोक आहेत जे चांगले स्टंट करून लोकप्रिय होतात. सध्या अशाच एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने आश्चर्यकारक स्टंट केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल हा तर भारतीय Iron Man आहे. रहदारीच्या रस्त्यावर चालत्या गाडीत केली चोरी; VIDEO पाहून चक्रावून जाल सध्या तरुणांमध्ये स्टंटबाजीचा ट्रेंड खूप वाढला आहे. कधी कधी काही लोक असे स्टंट करतात, जे पाहून सगळेच थक्क होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. कारण त्या व्यक्तीने ज्या पद्धतीने दगड फोडले ते खरोखरच अवाक करणारं आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की अनेक लोक एकत्र बसलेले आहेत, तेवढ्यात एक व्यक्ती येऊन तिथे बसलेल्या व्यक्तीकडून दोन दगड घेतो आणि मग तो जमिनीवर बसतो. यानंतर दोन्ही दगड एकावर ठेवतो आणि त्यावर जोरात हात मारतो. त्याने दगडावर हात आदळताच क्षणार्धात दग़़डाचे दोन तुकडे होतात. हे पाहून आजूबाजूला बसलेले लोकही थक्क झाले.

जेव्हा आपसात भिडले ब्लॅक पँथर आणि बिबट्या; खतरनाक फाईटचा शेवट बघाच, VIDEO

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 7 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘त्याच्या हातात iron man ची ताकद आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘भाऊ, एखादी व्यक्ती इतकी ताकदवान कशी असू शकते? आणखी एका यूजरने लिहिलं की, ‘हे पाहून मला कोयला चित्रपटातील शाहरुख खानची आठवण झाली.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या