रस्त्यावर गाडीवर बसून मुलगा मुलगी करु लागले अंघोळ
नवी दिल्ली, 18 मे : उन्हाळा सुरु असून लोक गरमीमुळे हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतच चालली आहे. काही ठिकाणी तर उष्मघातामुळे बऱ्याच जणांचा जीव गेला आहे. गरमीपासून सुटका करण्यासाठी लोक निरनिराळ्या युक्त्या वापरत आहे. जेणेकरुन गरम कमी होईल. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये गरमीपासून वाचण्यासाठी मुलगा मुलगी रस्त्यावर चालू गाडीवर अंघोळ करताना दिसले. या व्हिडीओनं सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी रस्त्याच्या मधोमध आंघोळ करताना दिसत आहेत. मुलगा गाडी चालवत असून मुलगी मागे पाण्याने भरलेली बादली घेऊल बसली आहे. ती स्वतःच्या आणि मुलाच्या अंगावर ते बादलीतलं पाणी ओतत आहे. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक हसत आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी मुलाने आणि मुलीने हा व्हिडीओ बनवला असावा.
@ItsAamAadmi नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने मुंबईचे ठाणे पोलिस आणि डीजीपी महाराष्ट्र यांना कॅप्शनमध्ये टॅग केले - @DGPMaharashtra, @ThaneCityPolice, हे उल्हासनगर आहे, मनोरंजनाच्या नावाखाली हा प्रकार बुलशिट आहे का? परवानगी आहे? उल्हासनगर सेक्टर-17 च्या मुख्य सिग्नलवर हा प्रकार घडला. असं करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती. व्हिडिओतील मुला-मुलींची कृती पाहून रस्त्यावर उपस्थित लोक हसत असून व्हिडिओ पाहणारे लोक त्यांच्या या कृतीवर संताप व्यक्त करत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत. यापूर्वीही उन्हाळ्यामध्ये अनेकांनी अशा आशयाचे व्हिडीओ बनवले होते. असे व्हिडीओ मनोरंजनाच्या उद्देशानं बनवले जातात. मात्र यामुळे काही लोकांच्याही भावना दुखावल्या जातात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तरुण तरुणी निरनिराळ्या गोष्टी करतात. तरुण वर्गच नाही तर आता यामध्ये चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वज सहभागी होत चाललेले पहायला मिळत आहेत.