मुंबई, 07 मार्च : झोपाळ्यावर बसायला कुणाला आवडणार नाही. त्यातही तो उंच आकाशात नेणारा आकाशपाळणा असेल तर मगत्यावर बसण्याचा मोह लहान मुलंच काय प्रौढांनाही आवरत नाही. सुरुवातीला उत्साहात आकाशपाळण्यात बसणारे काही लोकांची नंतर मात्र हवा चांगलीच टाइट होते. अशाच एका मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Funny Video of Swinging Boy). ज्याला आकाशपाळण्यात बसातच 33 कोटी देव आणि संपूर्ण खानदान आठवलं. आकाशपाळण्यात बसलेल्या या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला थोडा धक्का बसेल पण हसूही बिलकुल आवरणार नाही. तुम्ही पोट धरून हसाल. मोठ्या उत्साहात तो आकाशपाळण्यात बसतो. सुरुवातीला आपल्याला मजा येते आहे, असंसुद्धा तो सांगतो. पण जसा आकाशपाळणा गरागरा फिरू लागतो तसतसं त्याला भीती वाटू लागते, त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. तो देवदेवतांची नावं घेऊ लागतो. इतकंच नव्हे तर आपल्या आईबाबांसह संपूर्ण कुटुंबाचीच त्याला आठवण होते. हे वाचा - युक्रेनियन चिमुकलीचा भावुक करणारा VIDEO आला समोर, पाहूनच पाणावतील डोळे एका जत्रेत हा मुलगा गेला होता. उत्साहात तो आकाशपाळण्यात बसला.आकाशपाळणा सुरू होताच त्याचं बिधधास्त बोलणं आणि चेहऱ्यावरील हावभावही बदलले. तो मोठमोठ्याने ओरडू लागले. हर महादेव, जय बजरंग बली म्हणत आणि अशा कितीतरी देवांच्या नावांचा जप त्याने केला. फक्त देवांवरच तो थांबला नाही तर आईबाबां, काका-काकी, आजी-आजोबा अशा संपूर्ण कुटुंबाच्या नावाने तो ओरडू लागला.
व्हिडीओ नेमका कुठला आहे माहिती नाही पण त्याच्या भाषेवरून हा व्हिडीओ महाराष्ट्रातीलच असावा असं वाटतं आहे**.** हे वाचा - स्केटिंग करताना घडली भयंकर दुर्घटना; तरुणाची अवस्था पाहून उडेल थरकाप, VIDEO GiDDa CoMpAnY नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा व्हिडीओ पाहून बऱ्याच युझर्सनी मुझे लँड करा दे भाई म्हणणाऱ्या पॅराग्लायडिंग करणारा तो तरुण आठवल्याचं म्हटलं आहे.