JOIN US
मराठी बातम्या / Viral / दोन श्वानांसाठी विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये बुकिंग! दिल्लीपासून कॅनडापर्यंत करणार प्रवास

दोन श्वानांसाठी विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये बुकिंग! दिल्लीपासून कॅनडापर्यंत करणार प्रवास

आतापर्यंत तुम्ही रस्त्यांवर भटकणारे शेकडो श्वान बघितले असतील. भटकणाऱ्या श्वानांना कोणीही वाली नसतं. त्यामुळे ते आजारी पडल्यानंतर किंवा जखमी झाल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नसतं.

जाहिरात

दोन कुत्रे विमानाने करणार प्रवास

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 जुलै:  आतापर्यंत तुम्ही रस्त्यांवर भटकणारे शेकडो श्वान बघितले असतील. भटकणाऱ्या श्वानांना कोणीही वाली नसतं. त्यामुळे ते आजारी पडल्यानंतर किंवा जखमी झाल्यानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नसतं. हीच बाब लक्षात घेऊन श्वानप्रेमी डॉ. नवनीत कौर यांनी ‘अॅनिमल वेलफेअर अँड केअर सोसायटी’ची (एडब्ल्यूसीएस) स्थापना केली. त्यांच्या पुढाकारानं आता दोन भटकणारे श्वान थेट कॅनाडामध्ये जाणार आहेत. कधीकाळी अमृतसरच्या रस्त्यांवर भटकणारे दोन श्वान बिझनेस क्लासमध्ये प्रवास करून कॅनडाला पोहोचणार आहेत. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डॉ. नवनीत स्वतः अमेरिकेत राहतात पण, त्यांना भारत आणि अमृतसरबद्दल फार आत्मीयता आहे. 2020 मध्ये, जेव्हा जगभरात लॉकडाउन होतं तेव्हा त्यांनी एडब्ल्युसीएस ही संस्था स्थापन केली. अमृतसरमध्ये सुखविंदरसिंग जॉली यांनी या संस्थेचा पदभार स्वीकारला आणि संस्थेचं काम सुरू ठेवलं. या संस्थेच्या प्रयत्नांमुळे असंख्य भटक्या श्वानांना हक्काचा निवारा मिळत आहे. डॉ. नवनीत लवकरच लिली आणि डेझी नावाच्या दोन मादी श्वानांना कॅनडामध्ये घेऊन जाणार आहेत. कारण, ब्रँडा नावाच्या कॅनेडियन महिलेनं लिली आणि डेझीला दत्तक घेतलं आहे. या संबंधी कागदपत्रांची पूर्तता झाली असून 15 जुलै रोजी दोन्ही मादी श्वान दिल्लीहून कॅनडाला जातील.

आतापर्यंत डॉ. नवनीत यांनी सहा भारतीय श्वानांना परदेशात नेलं आहे. त्यापैकी दोन अमेरिकेत त्यांच्यासोबत राहतात. डॉक्टर नवनीत यांनी सांगितलं की, लिली आणि डेझी जवळपास महिनाभरापासून संस्थेत राहत आहेत. दोघींनाही कोणीतरी संस्थेत सोडून गेलं होतं. दोघींची प्रकृती खूपच खराब होती. संस्थेनं त्यांच्यावर उपचार करून त्यांच्यासाठी घर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. डॉ. नवनीत म्हणाल्या की, आपण भारतीयांनी आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आपण रस्त्यावरील श्वान पाळत नाही आणि त्यांना देशी मानतो. हेच श्वान इतर देशांतील नागरिकांसाठी परदेशी जातीचे ठरतात. विशेषत: कॅनडातील लोक भारतीय श्वानांना दत्तक घेण्यास फार उत्सुक असतात. कारण, त्यांच्या मते भारतीय श्वान अधिक मैत्रीपूर्ण आणि मालकाची काळजी करणारे असतात. यामुळेच ब्रँडा या दोन मादींना दत्तक घेत आहे. तिथे लिली आणि डेझीची चांगली काळजी घेतली जाईल. https://lokmat.news18.com/viral/shameful-act-sanitary-pad-found-in-dustbin-manager-undresses-female-employees-mhsz-916752.html डॉ. नवनीत लहानपणापासून श्वानप्रेमी आहेत. त्यांना श्वानांची काळजी घेणं आवडतं. त्यांच्या या प्रेमामुळेच लिली आणि डेझी सारख्या असंख्य भटक्या श्वानांना हक्काचं घर मिळत आहे. Keywords - Dogs, Dogs in Flight, Dogs in Business Class

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या