नवी दिल्ली, 10 एप्रिल : भारतात सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातात (Road Accident) होतात. एक लहानशी चूकही एखाद्याचं आयुष्यभरासाठी मोठं नुकसान करू शकते. रस्ते अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्वही आलं आहे. रस्ते अपघाताचे अनेक भयंकर व्हिडीओ दरदिवशी समोर येत असतात. असाच एक भयानक व्हिडीओ समोर आला असून कारने एका स्कूटी चालकाला चिरडलं आहे. कार आणि स्कूटी अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला असून हा कर्नाटकातील मंगळुरू येथील आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अतिशय वेगात असलेल्या BMW कारने एका स्कूटी महिला चालकाला चिरडलं आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या अपघातात महिला अतिशय गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी मंगळुरू जिल्ह्यातील बल्लभगढ जंक्शन येथील आहे. दुपारी जवळपास एकच्या सुमारास हा अपघात झाला. एका अतिशय स्पीडमध्ये आलेल्या BMW कारने डिव्हाइडर क्रॉस करुन दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या स्कूटी चालक महिलेला उडवलं. BMW इतकी वेगात होती, की डिव्हाइडर क्रॉस झाला आणि गाडी दुसऱ्या बाजूला वळली. या अपघातात आणखी एक महिला थोडक्यात बचावली. स्कूटी चालक महिला यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
याआधीही अपघाताचे असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. चार दिवसांपूर्वी मुंबईतील भाविक लोणावळ्यात एकविरा देवीचं दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. या भाविकांच्या गाडीला अपघात घाला. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कारने चार ते पाच वेळा पलटी मारली. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. खंडाळा आरपीटीएस साठे मिसळच्या अवघड वळणावर हा अपघात घडला. सकाळी 8 च्या सुमारास झालेल्या या अपघातातील कारमध्ये पाच ते सहा प्रवासी होते.
कार भरधाव वेगात होती. वळणावर आल्यामुळे कारचालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली उतरली आण 3 ते 4 पलट्या मारून थांबली. मात्र दैव बलवत्तर होतं म्हणून कारमधील प्रवासी सुखरूप वाचले. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.