JOIN US
मराठी बातम्या / Viral / बघता-बघता नदीत तयार झाला खड्डा...समोर आलेलं सगळं गिळंकृत केलं, पाहा थरारक VIDEO

बघता-बघता नदीत तयार झाला खड्डा...समोर आलेलं सगळं गिळंकृत केलं, पाहा थरारक VIDEO

केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमधील केरीको शहरातील स्थानिक नदीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नैरोबी, 10 मे : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी अजब असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारणही तसंच आहे. सगळंकाही सुरळीत सुरू असताना अचानक प्रवाहात भोवऱ्यासारख्या हलचाली सुरू होतात आणि मोठा खड्डा पडतो. पाण्याव्यतिरिक्त नदीत ज्या इतर गोष्टींसह गवतही हा ह्या खड्ड्याकडे वेगानं खेचलं जातं. आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता किती वेगानं गवत भोवऱ्यात ओढलं जात आहे. हा व्हिडीओ केनियाच्या केरिचो या शहरातला असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमधील केरीको शहरातील स्थानिक नदीचा आहे. यापूर्वी या भागात बराच पाऊस झाला होता आणि स्थानिक नदीतही भरपूर पाणी होते. या 38-सेकंदाच्या व्हिडीओमध्ये अचानक पाण्यात एक खड्डा तयार झाल्याचं दिसत आहे. त्यात फक्त पाणी शिरत नाही तर लांब गवत आणि सभोवतालचे सर्व काही आता खेचून घेत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

केनियाचा हा परिसर पूर्व आशियाई ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणून ओळखला जातो. शास्त्रज्ञांच्या मते, ही ती जागा आहे जिथून आफ्रिकन प्लेट हळूहळू दोन भागात विभागली जात आहे. हा परिसर ज्वालामुखीचा प्रदेश देखील आहे. त्यामुळे बऱ्याचवेळा असे प्रकार घडतात. 2017 रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये अशीच एक घटना समोर आली होती. त्यानंतर आता हा अजब व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा- …आणि अचानक समोर आला हत्ती, पुढे काय घडलं पाहा श्वास रोखून ठेवणारा VIDEO हे वाचा- VIDEO : लॉकडाऊनमध्ये खाण्याच्या शोधा घरी आला जंगली पाहुणा छतावर चढला आणि… हे वाचा- शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनं शिकवला धडा, पाहा VIDEO संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या