पक्ष्याची विमानाला धडक
नवी दिल्ली, 16 जून : विमानाने अनेकजण प्रवास करतात. मात्र उंच हवेत विमान असताना अनेक गोष्टी विमानाला येऊन धडकतात. कधी कधी पक्षीही विमानाला धडकतात. अशा परिस्थिती विमान कोसळण्याची किंवा त्याचा तोल जाण्याचीही शक्यता बऱ्याचदा असते. अशा परिस्थितीत वैमानिकचा समजूतदारपण अधिक महत्त्लाचा ठरतो. तो अशा परिस्थितीत काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं असतं. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एक पक्षी विमानाला जोरात धडकला. या अपघातात वैमानिकाने जे केलं ते पाहून तुम्हीही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सध्या समोर आलेल्या घटनेत विमानाला एक पक्षी जोरदारपणे धडकतो. ज्यामुळे तो थेट विंडशील्ड तोडून आता जातो. या अपघातात पक्षाला एवढं लागतं की त्याच्या शरिरावर बऱ्याच जखमा होतात. ज्याचे रक्त विमान चालवणाऱ्या वैमानिकाच्या अंगावरही उडतं. अशा रक्ताने भरलेल्या अवस्थेत वैमानिक अगदी धाडसाने तो विमान चालवत राहतो आणि सुरक्षितरित्या लॅंडिंग करतो.
यावेळीचे दृश्य खुद्द वैमानिकाने कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. हे प्रकरण इक्वेडोरच्या लॉस रिओस प्रांताचे आहे. स्क्वॉड्रन लीडर एरियल व्हॅलेंटेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो त्याने स्वतः रेकॉर्ड केला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की, जेव्हा पायलट विमान उडवत होते, तेव्हा एक मोठा पक्षी येऊन धडकतो. विंडशील्ड तोडून तो कॉकपिटच्या आत प्रवेश करतो. अपघात एवढा भीषण होता की पक्ष्याचे अनेक तुकडे झाले. त्याचे रक्त पायलटच्या अंगावर पडले आणि तो रक्ताने माखलाय. मात्र त्याने शांततेत काम केलं आणि सुरक्षित लॅंडिंग केलं.
@ZeusKingOfTwitt नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 14 सेकंदांच्या व्हिडीओमध्य तुम्ही पाहू शकता, पक्षाचे पंजे दिसत आहे. तरीही पायलट धैर्याने विमान चालवतोय. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. अनेकजण त्या पायलटचं कौतुक करत आहेत.