JOIN US
मराठी बातम्या / Viral / जगातला सर्वात श्रीमंत माणूस झाला 'रिक्षावाला', बिल गेट्स यांचा व्हिडीओ व्हायरल

जगातला सर्वात श्रीमंत माणूस झाला 'रिक्षावाला', बिल गेट्स यांचा व्हिडीओ व्हायरल

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ते भारतात आल्यापासून त्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

जाहिरात

बिल गेट्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 मार्च : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ते भारतात आल्यापासून त्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली सोबतच त्यांचा स्मृती इरांनीसोबतचाही व्हिडीओ पहायला मिळाला. अशातच बिल गेट्सचा रिक्षा चालवताना एक व्हिडीओ समोर आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे उद्योगपती आनंद महिंद्रांनीही त्यांचा तो व्हिडीओ शेअर केला आहे. जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स हे आपले भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे चाहते झाले आहेत. याविषयी बिल गेट्स यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. सोबत तो व्हिडीओ आनंद महिद्रा यांनीदेखील ट्विट केला आहे. त्यामुळे काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

भारतात आल्यानंतरच्या अनेक गोष्टी बिल गोट्सने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांनी महिंद्रा ऑटोची इलेक्ट्रिक रिक्षा, महिंद्रा ट्रेओ देखील चालवली आणि त्यानंतर त्यांनी आनंद महिंद्रा यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अध्यक्ष बिल गेट्स यांनी सोमवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते महिंद्रा ऑटोची लोकप्रिय इलेक्ट्रिक रिक्षा महिंद्रा ट्रेओ चालवताना दिसत आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ 7 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर ‘बाबू, समझो ईशारे, होरण पुकारे… पम-पम-पम’ हे गाणे वापरण्यात आले आहे.

दरम्यान, आनंद महिद्रांनीही बिल गेट्सचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबत आनंद महिंद्रा यांनी लिहिलं की, चलती का नाम बिल गेट्स की गाडी, खूप छान वाटलं की तुम्हाला वेळ मिळाला महिंद्रा ऑटोची इलेक्ट्रिक रिक्षा चालवण्यासाठी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या