JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - भरधाव ट्रकला 'लटकला' बाईकस्वार; ड्रायव्हिंग करताना फास लागला अन्...

VIDEO - भरधाव ट्रकला 'लटकला' बाईकस्वार; ड्रायव्हिंग करताना फास लागला अन्...

चालत्या बाईकवरील तरुण भरधाव ट्रकच्या दोरीत अडकला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

ट्रकच्या दोरीत अडकला बाईकस्वार.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 15 डिसेंबर :  अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी गाड्यांची एकमेकांना धडक, कधी गाडी डिव्हाइडरला धडकणं, कधी गाडी दरीत कोसळणं अशा बऱ्याच अपघाताच्या घटना तुम्हाला माहिती असतील. सध्या अपघाताचा असाच एक भयानक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यात भरधाव ट्रकची दोरी एका बाईकस्वाराच्या गळ्यात अडकली. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच ट्रकना दोऱ्या बांधलेल्या असतात. माल वाहून नेताना तो सुरक्षित राहावा, पडू नये यासाठी या दोऱ्या असतात. या व्हिडीओतील ट्रकलाही अशीच दोरी बांधली होती. गोण्यांनी भरून जाणारा हा ट्रक, ज्याची दोरी तुटली आणि त्यात हा बाईकस्वार अडकला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता समोरून एक ट्रक येताना दिसतो. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने त्याचवेळी एक बाईकस्वार येतो. ट्रकला बांधलेली दोरी सुटते आणि ती खाली लटकते. त्याचवेळी ट्रकमधील सामानही रस्त्यावर पडतो. यावेळी ट्रकच्या बाजूने एक बाईकस्वार जात असतो. ही ट्रकला लटकणारी दोरी बाईकस्वाराच्या गळ्यात अडकते. हे वाचा -  जमिनीवरून थेट हवेत, गरागरा फिरली अन्…; कार अपघाताचा थरारक VIDEO दोरीचा एक भाग ट्रकला अडकलेला आहे, ट्रक पुढे निघून जातो तेव्हा बाईकस्वारही त्या दोरीसह खेचला जातो. बाईकवरून हवेत उडून तो काही अंतरापर्यंत फरफटत जातो. नंतर ट्रक पुढे निघून जातो आणि बाईकस्वार रस्त्यावर कोसळतो. @Singh17Nandan ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही घटना तामिळनाडूच्या थुथूकडी जिल्ह्यातील आहे. हा तरुण ऑफिसला जात होता, तेव्हा त्याचा अपघात झाला. स्थानिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं. माहितीनुसार त्याला दुखापत झाली आहे. हे वाचा -  रस्त्यावर ती पाणी पित बसली आणि भरधाव वेगानं आली कार, पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक, Video Viral जिथं हा अपघात झाला तिथं जवळच असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताचं हे भयंकर दृश्य कैद झालं. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

काळजाचा ठोका चुकवणारा असा हा व्हिडीओ आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवर काही प्रतिक्रिया असेल तर ती आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या