फटाका पेटवताना भाजप नेते विनय सिंह.
पाटणा, 19 ऑक्टोबर : दिवाळी म्हणजे फटाके आलेच. काही लोक फटाके फोडण्यासाठी खूपच उत्सुक असतात. तर काहींना फटाके फोडायची इच्छा असते पण त्यांना भीती वाटते. असेच फटाके फोडणाऱ्या एका भाजप नेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. फटाका पेटवताना भाजप नेते तोंडावरच पडले आहेत. यामुळे फटाके पेटवणारे हे नेते चांगलेच चर्चेत आले आहेत. भाजप नेते विनय सिंह एका मैदानात फटाका पेटवत होते, त्याचवेळी ते तोंडावर पडले. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विनय सिंह यांनी फटाका पेटवला. त्यावेळी ते घाबरतही होते. त्यांचा हात-पुढे मागे होत होता. जसा फटाक्याला आग लागली तसे ते पळू लागले. पण पळता पळता मागे वळून पाहत होते आणि त्याच क्षणी ते अडकले आणि त्यांचा तोल गेला. ते धाडकन जमिनीवर कोसळले. तोंडावर आडवे पडले. जसे विनय सिंह पडले तसा फटाकाही फुटला. हे वाचा - TB Patient Diwali Offer : ‘टीबी रुग्णाला आणा सोनं-चांदी, पैसे, मोबाईल घेऊन जा’, रुग्णालयाची अजब दिवाळी ऑफर माहितीनुसार दिघवारातील मलखाचकच्या जसा सिंह क्रिडा मैदानातील ही घटना आहे. भाजपाचे वरिष्ठ नेता विनय सिंह एका फुटबॉल मॅचचं उद्घाटन करायला गेले होते. मॅच सुरू होण्याआधी त्यांना फटका पेटवण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी ही घटना घडली. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
भाजप नेत्यांना पाहून तुम्हाला तुमचा पहिल्यांदा फटाके पेटवतानाचा पहिला अनुभव नक्कीच आठवला असेल. सुदैवाने भाजप नेते फटाके पेटवल्यानंतर तिथंच पडले नाहीत. नाहीतर फटाका त्यांच्यावरच फुटला असता. हे वाचा - VIDEO - आईने असं काही केलं की 3 वर्षीय चिमुकल्याची थेट पोलिसात धाव; म्हणे, ‘मम्मीला तुरुंगात टाका’ दिवाळी म्हणून तुम्हीही आतापासूनच फटाके फोडत असाल तर फटाके फोडताना काय काळजी घ्यायची तेसुद्धा लक्षात घ्या. प्रत्यक्ष हाताने फटाक्याची वात पेटवू नका. त्यासाठी काठीचा आधार घ्या. फटाका पेटल्यानंतर दूर अंतरावर थांबा. फटाके माती, वाळू, खडी व मुरुम असलेल्या ठिकाणी फोडू नयेत. तिथे स्फोट होऊन ती खडी, मुरुम उडून चेहऱ्यावर इजा होऊ शकते. लहान मुलांसोबत तिथे मोठ्यांनी उपस्थित राहिले पाहिजे