व्हायरल
नवी दिल्ली, 24 मार्च : समुद्र पाहण्यासाठी जेवढा चांगला वाटतो तेवढाच तो भयानकही आहे. जेवढा तो शांत आणि हवाहवासा वाटतो तेवढाच तो खवळल्यावर भयावह बनतो. त्यामुळे अनेकांना समुद्र छान तर काहींना तो भीतीदायक वाटतो. समुद्रातील अनेक चांगले वाईट व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असताना पहायला मिळतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये मात्र यावेळीचा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. क्रूझसारख्या मोठ्या बोटीतून प्रवास करणे खूप छान आहे. पण सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये समुद्राच्या जोरदार लाटांसमोर क्रूझची वाईट अवस्था झालेली पहायला मिळाली. व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक मोठी बोट समुद्रामध्ये मस्त तरंगत चाललीये. मात्र काही वेळातच समुद्रात मोठ्या लाटा येतात आणि यामुळे बोट एखाद्या पानासारखी उलटते. हे दृश्य खूप भयावह दिसत असून कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अनेक प्रवाशांना घेऊन एक क्रूझ समुद्रात होती, तेव्हा लाटांनी एवढं भयंकर रूप दाखवलं. त्यानंतर समुद्रात बोट उलटताच त्यात उपस्थित असलेले लोक खाली पडून इकडे-तिकडे वाहू लागले.
@OnlyBangersEth ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला समुद्रात फिरण्याची हिम्मत होणार नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 37 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येताना पहायला मिळतायेत.
दरम्यान, यापूर्वीही असे समुद्रातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्रूझसारख्या मोठ्या बोटीतून प्रवास करणे खूप छान आहे. मात्र अनेक वेळा जीवघेणंही ठरु शकतं. याचंच एक उदाहरण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ.