JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : दुःखाचे नव्हे, हे अश्रू आनंदाचे; कोविड योद्ध्या महिलेच्या अनोख्या कौतुकाचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO : दुःखाचे नव्हे, हे अश्रू आनंदाचे; कोविड योद्ध्या महिलेच्या अनोख्या कौतुकाचा व्हिडीओ व्हायरल

20 दिवस सलग कोरोना रुग्णांची सेवा केल्यानंतर ही डॉक्टर घरी पोहोचली तेव्हा तिचं अनोखं स्वागत झालं. या स्वागताने तिला अक्षरशः गहिवरून आलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 4 मे : Coronavirus च्या साथीत माणुसकीची आणि माणुसकीला काळिमा फासणारी दोन्ही उदाहरणं समोर येत आहेत. अशा वेळी एका सोसायटीतला कोरोना योद्धा महिलेचा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 20 दिवस सलग कोरोना रुग्णांची सेवा केल्यानंतर ही डॉक्टर घरी पोहोचली तेव्हा तिचं अनोखं स्वागत झालं. या स्वागताने तिला अक्षरशः गहिवरून आलं. बंगळुरूच्या डॉ. विजयश्री यांच्यासाठी हे असं स्वागत अनपेक्षित होतं. त्या राहात असलेल्या सोसायटीच्या रहिवाशीने उस्फूर्तपणे त्यांनी केलेल्या रुग्णसेवेचं कौतुक म्हणून एकत्रितपणे आपापल्या घरातूनच टाळ्या वाजवल्या. सोसायटीच्या आवारात लॉकडाऊनच्या भयाण शांततेत या टाळ्यांचा आवाज अचानक घुमला आणि या गजरातच डॉ. विजयश्री यांनी घरात 20 दिवसांनंतर आगमन केलं. आपल्या कामाचं असं कौतुक होताना पाहून विजयश्री यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. हा भावुक करणारा VIDEO बंगळुरूच्या महापौरांनी शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

एम. गौतम या बंगळुरूच्या महापौरांनी Twitter वर हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे, “एम. एस. रामैय्या रुग्णालयात COVID-19 च्या रुग्णांची 20 दिवस देखभाल केल्यानंत घरी येणाऱ्या डॉ. विजयश्री यांचं असं हीरोच्या थाटात स्वागत झालं.” Lockdown मध्ये बाईकवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन, VIDEO VIRAL त्यांना अशा सगळ्या कोरोना वॉरिअर्सचं कौतुक केलं आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. माणुसकीचा आणि कृतज्ञतेचा गहिवर याहूनही या अश्रूंमधली भावना मोठी आहे, हेच यातून दिसतं. कहर VIDEO: दारूसाठीच्या रांगेचं हे चित्र पाहून विश्वास नाही बसणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या