JOIN US
मराठी बातम्या / Viral / Strange Tradition: लग्नानंतर टॉयलेटला जाण्यास बंदी; या ठिकाणी आहे ही विचित्र प्रथा

Strange Tradition: लग्नानंतर टॉयलेटला जाण्यास बंदी; या ठिकाणी आहे ही विचित्र प्रथा

लग्न म्हटलं की विधी परंपरा आलेच. प्रत्येक ठिकाणी लग्नाविषयीच्या निरनिराळ्या विधी, परंपरा, प्रथा असतात. त्यानुसार नवरा नवरी लग्नाच्या आधी आणि नंतरच्या प्रथांचं, परंपरांचं पालन करतात.

जाहिरात

लग्नानंतर टॉयलेटला जाण्यास बंदी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 जून : लग्न म्हटलं की विधी परंपरा आलेच. प्रत्येक ठिकाणी लग्नाविषयीच्या निरनिराळ्या विधी, परंपरा, प्रथा असतात. त्यानुसार नवरा नवरी लग्नाच्या आधी आणि नंतरच्या प्रथांचं, परंपरांचं पालन करतात. काही ठिकाणी तर खूप विचित्र गोष्टी असतात. ज्याचा आपण विचारही करु शकत नाही. जगात अशीही एक परंपरा आहे जिथे वधू वर लग्न झाल्यानंतर टॉयलेटला जाऊ शकत नाही. ही प्रथा नेमकी काय आहे आणि कोणत्या ठिकाणची आहे याविषयी जाणून घेऊया. जगात असा एक देश आहे जिथे लग्नानंतर तीन दिवस वधू वर टॉयलेटमध्ये जाऊ शकत नाहीत. येथे नवविवाहित जोडप्याला लग्नानंतर तीन दिवस शौचालयात जाण्यास मनाई असते. लग्नानंतर हा अनोखा विधी इंडोनेशियातील टिडोंग नावाच्या समुदायात केला जातो.

लग्नानंतर टॉयलेटला जाण्याच्या विधीबद्दल अनेक समजुती आहेत ज्यामुळे लोक ते करतात. इंडोनेशियातील टिडोंग समुदाय विधींनी खूप मानतात. ते पूर्ण गांभीर्याने हे विधी करतात. विवाह हा पवित्र सोहळा असल्याची या प्रथेमागील धारणा आहे, वधू-वरांनी शौचास गेल्यास त्यांचे पावित्र्य भंग होऊन ते अपवित्र होतात. त्यामुळे वधू-वरांना लग्नानंतर तीन दिवस शौचास जाण्यास मनाई आहे. .जर कोणी असं केलं तर ते अशुभ मानलं जातं. टिडोंग समुदायामध्ये हा विधी करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे नवविवाहित जोडप्यांना वाईट नजरेपासून वाचवणं. या बंधुभावाच्या लोकांच्या समजुतीनुसार जिथे मलमूत्र असते तिथे घाण असते, त्यामुळे नकारात्मक शक्ती असतात. लग्नानंतर लगेच वधू-वर शौचालयात गेले तर त्यांच्यावर नकारात्मकतेचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात, नात्यात दुरावा येऊ शकतो आणि नवविवाहित जोडप्याचं लग्न तुटूही शकतं. अविवाहित पुरुषांना विवाहित महिला का आवडतात? कारण जाणून व्हाल थक्क या लोकांचा असा विश्वास आहे की लग्नानंतर लगेचच वधू-वरांनी शौचालयाचा वापर केला तर ते त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा परिस्थितीत दोघांपैकी कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. विधी चांगल्या प्रकारे पार पाडता यावं म्हणून त्यांना कमी अन्न आणि कमी पाणी दिलं जातं. या ठिकाणी हा विधी अत्यंत काटेकोरपणे केला जातो. दरम्यान, जगभरात लग्नाबाबत अनेक समज आहेत. काही लोक अनेक वर्षांपासून जुन्या परंपरा, विधी, प्रथा मानत आले आहेत. त्यामुळे अजूनही लग्नाबाबत विचित्र गोष्टी पहायला मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या