मुंबई 8 जुलै: ब्रिटनमधील वेस्ट मिडलॅँड्स सफारी पार्कमध्ये (West Midlands Safari Park) पांढऱ्या गेंड्याच्या मादीने एका पिलाला जन्म दिला असून ती संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मादी आपल्या पिलाला जन्म देण्यासाठी करत असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा अतिशय चित्तथरारकपणे या व्हिडिओमध्ये चित्रित झाली आहे. आपण टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर प्राण्यांशीसंबंधित कुतूहलात्मक कित्येक व्हिडिओज पाहत असाल आणि तुम्हाला ते व्हिडिओज आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करण्याचा मोह आवरत नसेल. असंच काहीसं, त्या पार्कमधील जूकीपर्ससोबत झालं. ज्याने ही घटना सीसीटीव्हीमध्ये पाहिली आणि ती सोशल मीडियावर शेअर केली. Shocking! टॉयलेट सीटवर बसताच गुप्तांगाला चावला भलामोठा अजगर आणि… सफारी पार्कमधून जो व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये असं दिसत आहे की, गेंड्याची मादी आपल्या पिलाला जन्म देण्याचा खटाटोप करत आहे. त्या मादीचे नाव कियाह (Keyah) असं आहे जी साउदर्न व्हाइट राइनो (Southern Rhino Female) म्हणजेच गेंडी आहे. 16 महिने गरोदर राहिल्यानंतर या मादीने अत्यंत गोड अशा पिल्लाला जन्म दिलेला आहे. व्हिडिओच्या सुरूवातीला दिसतंय की, ही मादी प्रसूती वेदनेने त्रस्त होऊन कुंपणाच्या आवारात गोल फिरत आहे. आणि फिरता फिरता तिचे पिल्लू तिच्या गर्भाशयातून बाहेर यायचा प्रयत्न करत आहे. ते पिलू अजूनही बर्थ सॅकमध्येच(Birth Sack) आहे. बायकोच्या बडबडीला वैतागलात? या व्यक्तीला सापडला तिची बोलती करणारा रिमोट
संपूर्ण कुंपणात गोल गोल फिरून ती मादी आपल्या पिल्लाला सुरक्षितपणे गर्भाच्या बाहेर काढते, जे पिल्लू सुरक्षितपणे जवळच्या गवतावर पडते. त्यानंतर ही मादी, प्रेमाने त्या पिल्लाच्या जवळ जाते आणि त्याला हलवायचा प्रयत्न करताना दिसते. आणि हे पिल्लू स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न देखील करताना दिसत आहे. तर, नुकत्याच जन्मलेल्या या गेंड्याच्या पिल्लाचं नावही या वर्षी जन्मलेल्या इतर प्राण्यांप्रमाणे जे अक्षरापासून सुरू होईल. तसंच या पिल्लानंतर काही आठवड्यांनी याच सफारी पार्कमध्ये एका दुसऱ्या पांढऱ्या गेंड्याच्या मादीनेही पिल्लाला जन्म दिल्याची माहिती समोर येत आहे. नुकतीच प्रसूती झालेल्या कियाहच्या पोटी नर गेंड्याची आत्तापर्यंत पाच पिल्ले जन्माला आली आहेत. आणि अशी आशा व्यक्त केली जात आहे की, प्रजनन कार्यक्रमांतर्गत (Breeding Programme) लवकरच या गेंड्याकडून आणखी पंधरा पिलं जन्माला घातली जातील. तसेच गेंड्यांची ही प्रजाती जवळजवळ संपुष्टात (Near threatened) आलेली प्रजाती आहे असे दिसून आले आहे. भविष्यात लोप पावणाऱ्या ह्या प्रजातीची वाढ करणं सध्या जगासमोर मोठं आव्हानदेखील आहे. निसर्गाच्या समतोलतेसाठी या सर्व जंगली प्राण्यांचे अस्तित्त्व खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच गेंडा मादीचा हा पिल्लाला जन्म देतानाचा व्हिडिओ पाहून गेंड्याच्या प्रजातीत वाढ व्हावी अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.