व्हायरल
अकोला, 22 मार्च : आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या बाबांच्या घटना समोर आल्या आहेत. लोकांना ठीक करणारे, त्यांच्या समस्या दूर करणारे, आजार पळवून लावणारे, अशा अनेक निरनिराळ्या घटना आत्तापर्यंत समोर आल्यात. अशा बाबांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलीये. सोशल मीडियावर सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, एक बाबा लांबलचक चुलीवर बसला आहे. अनेक लोक त्याच्या जवळ येऊन त्याचा आशिर्वाद घेत आहेत. धोतर घालतेला, बिडी ओढताना हा बाबा लोकांशी काहीतरी बोलत असल्याचं दिसून येतंय. त्याच्याप्रती लोकांची श्रद्धा असून अनेकजण त्याच्या भेटीस येत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया येताना दिसतायेत.
@Liberal_India1 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अकोल्याचा असल्याचं समोर आलंय. व्हिडीओ शेअर करत वापरकर्त्यानं कॅप्शन दिलंय, ‘चुलीवरील मटण, मिसळ, आईस्क्रीम नंतर आता मार्केटमध्ये चुलीवरील बाबा आलाय’
बहुतेक या व्यक्तीचं संतुलन बरोबर नाही, बागेश्वर बाबाच्या तोडीचा आहे राव, बाबाला भाजत लय असणारे पण सांगणार कोणाला, तो बाब्या प्यायलेला वाटतोय, सगळ्या मेंटल हॉस्पिटलमध्ये आजारी रुग्ण बाहेर आले ते सगळे बाबा म्हणून नाव लौकिकास येतील, अशा अनेक कमेंट या व्हायरल व्हिडीओवर येत आहेत.