नवी दिल्ली, 11 एप्रिल : सध्या ऑप्टिकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. अनेकदा लोक हे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहून विचारात पडतात. आता असाच एक फोटो व्हायरल झाला असून अनेकांना या फोटोने विचार करायला लावलं आहे. सध्या व्हायरल झालेल्या या फोटोने व्यक्तीचं व्यक्तीमत्व आणि त्यांच्या रिलेशनबाबत अनेक खुलासे करण्याचा दावा केला आहे. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये एक अर्धवट खाल्लेलं सफरचंद दिसतं आहे. आणि दुसऱ्या अँगलने हा फोटो जवळून पाहिल्यास समोरासमोर असलेल्या दोन व्यक्तींचं प्रोफाइल दिसेल.
तुम्हाला सर्वात आधी कोणता अँगल दिसला? जर तुम्ही सर्वात आधी अर्धवट राहिलेलं सफरचंद पाहिलं, तर तुम्ही तुमच्या जीवनात खुश आहात. तुम्ही आयुष्यातील गोष्टींचा तसाच स्वीकार करता, जशा त्या येतात. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवता. तसंच ही तुमची जवळची माणसं तुम्हाला नेहमी मदत करतील असा विश्वासही तुम्हाला असतो. तुम्ही नेहमी चांगल्या मूडमध्ये असता आणि तुमच्या सकारात्मक वाइब्स इतरांपर्यंत पोहोचवता.
जर तुम्ही दोन व्यक्तींचं प्रोफाइल पाहिलं तर… या अर्धवट खाल्लेल्या फोटोमध्येच दुसरं चित्र दोन व्यक्तींचं दिसतं. समोरासमोर चेहेरे असलेल्या दोन व्यक्ती दिसतात. जर तुम्हाला सफरचंदऐवजी सर्वात आधी हे चेहेरे दिसले असतील तर तुम्ही आपल्या रिलेशनला, नात्यांना सर्वोच्च स्थान देता, तुमचं नातं तुमची प्राथमिकता आहे. यामुळे असंही दिसतं, की तुम्ही तुमच्या खास व्यक्तीसोबत अनिश्चिततेच्या काळातून जात आहात. त्यामुळे सर्व गोष्टी तुमच्या मनात ठेवू नका, तुमच्या जवळच्या व्यक्तींशी बसून बोलून चर्चा करा. चर्चा केल्यानंतर तुमच्या गोष्टी निश्चितपणे सुधारू शकतात.