JOIN US
मराठी बातम्या / Viral / संतापलेल्या हत्तीचा रस्त्यावरच धिंगाणा; पाठलाग करत सोंडेनं उचलली कार अन्.., Shocking Video

संतापलेल्या हत्तीचा रस्त्यावरच धिंगाणा; पाठलाग करत सोंडेनं उचलली कार अन्.., Shocking Video

व्हिडिओमध्ये दिसतं की भुकेनं व्याकूळ झालेला हा हत्ती अतिशय संतापला आहे. हत्ती रस्त्याने ये-जा करणाऱ्या गाड्यांचा पाठलाग करून त्यावर हल्ला करत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 जानेवारी : सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील प्राण्यांच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. अनेकदा यात प्राण्यांची मजेशीर मस्ती पाहायला मिळते, बऱ्याचदा भावुक करणारे व्हिडिओही समोर येतात. मात्र, प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्र्याने मालकासोबत दोरीच्या उड्या मारून केला विश्वविक्रम, थेट गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदवलं नाव या व्हिडिओमध्ये एक भुकेलेला हत्ती गाड्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हत्ती हा अतिशय बलाढ्य मात्र काहीसा शांत प्राणी आहे. सहसा हा प्राणी कोणावर हल्ला करताना दिसत नाही. मात्र, तो आक्रमक झाल्यास आणि चवताळल्यास समोर कोणीही आलं तरी त्याला सोडत नाही. अशाच या हल्ला करणाऱ्या हत्तीचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये दिसतं की भुकेनं व्याकूळ झालेला हा हत्ती अतिशय संतापला आहे. हत्ती रस्त्याने ये-जा करणाऱ्या गाड्यांचा पाठलाग करून त्यावर हल्ला करत आहे. गाडीमागे धावत तो आपल्या सोंडीने पूर्ण कार उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतो. दुसऱ्या कारमध्ये असलेल्या व्यक्तीने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. तरुणीने फणा काढलेल्या नागाची शेपटीच पकडली; पुढं जे घडलं ते पाहून फुटेल घाम..VIDEO हत्तीच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ गुवाहाटीतील नारेंगी आर्मी कॅम्पमधील असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. काहींनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून यूजर्सनी आश्चर्य व्यक्त करत म्हटलं, की आपण त्यांच्या जंगलाची तोड केल्यानंच हे सगळं होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या