JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! आधी पळव पळव पळवलं नंतर जमिनीवर आपटलं; एका कोंबड्याने तरुणीचे केले हाल

बापरे! आधी पळव पळव पळवलं नंतर जमिनीवर आपटलं; एका कोंबड्याने तरुणीचे केले हाल

कोंबड्याने तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर खतरनाक हल्ला केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 मार्च : आतापर्यंत माणसांना तुम्ही कोंबड्यांच्या मागे धावताना आणि कोंबड्यांना त्यांच्यापासून वाचण्यापासून पळताना पाहिलं आहे. पण आता एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये माणूस पुढे आणि कोंबडा त्याच्यामागे धावताना दिसला. एरवी तुम्ही अंड्यांना किंवा पिल्लांना हात लावला तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी कोंबड्यांना माणसांवर हल्ला करताना पाहिलं असेल. पण या व्हिडीओत मात्र कोंबड्याने एका तरुणीवर भयंकर हल्ला केला आहे (Cock attack on girl). कोंबड्याने तरुणीवर केलेल्या भयंकर हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचा कोंबडा आणि तरुणी पळताना दिसत आहे. तरुणी पुढे आणि कोंबडा मागे आहे. सुरुवातीला एका स्विमिंग पूलजवळ दोघं दिसतात. तरुणीच्या चेहऱ्यावरील हावभावावरून कोंबडा तिच्यावर हल्ला करण्यासाठी तिचा पाठलाग करतो आहे, हे स्पष्ट येतो. ती खूप घाबरलेली दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावर भीती आहे. स्विमिंग पूलवरून पळत पळत तरुणी घरात घुसते. पण तरी कोंबडा तिचा पिच्छा सोडत नाही. तोसुद्ध घरात घुसतो. हे वाचा -  VIDEO - इवल्याशा तोंडात जबडा धरला आणि…; एवढ्याशा बेडकाने श्वानाचे केले हाल घरात घुसताच पळताना तरुणीचा तोल ढासळतो आणि ती घसरून धाडकन जमिनीवर कोसळतो. कोंबड्याने जरी तिला स्वतःहून जमिनीवर आपटलं नसलं तरी त्याच्यामुळे ती अशी कोसळते कारण तो तिचा पाठलाग करत असतो. ही घटना या तरुणीच्या फ्रेंडने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. तरुणीला तिच्या फ्रेंड्सनी पळू नको असं सांगितलं होतं. पण ती ऐकली नाही. कोंबड्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी ती पळत राहिली आणि अखेर कोंबड्याने आपला डाव साधलाच. आधी पळव पळवव पळवलं त्यानंतर तिला जमिनीवर पाडलं आणि नंतर तिथून निघूनही गेली. हे वाचा -  भलेभले शोधून थकले पाहा तुम्हाला सापडतोय का या फोटोत दडलेला बिबट्या टिकटॉकवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला. जो व्हायरल होत आहे. भारतात टिकटॉक बॅन असल्याने या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या