मुंबई 10 डिसेंबर : लग्न हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न असतं. दुसरीकडे अशाही अनेक मुली आहेत ज्यांच्यासाठी ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा आहे. अनेक पालक गरिबीसमोर हतबल असतात. हुंडा देऊ शकत नाही, या विचाराने ते आपली मुलगी कोणाच्याही हाती सोपवतात, मुलीचं लग्न केलं की डोक्यावरील ओझंच उतरलं असं त्यांना वाटतं. तर काहीजण बळजबरीने आपल्या मुलीचं लग्न करतात. सध्या सोशल मीडियावर जनजागृतीचा अशाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात स्टेजवर वराला पाहून वधूने असं काही केलं की सगळेच थक्क झाले. वरात दारात अन् नवरी प्रियकरासोबत फरार; अखेर नवरदेवाने नवरीच्या बहिणीकडेच केली अजब मागणी एक व्हिडिओ ट्विटरवर @JaikyYadav16 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लग्नाच्या मंचावर वृद्ध वराला पाहून वधूला राग आला आणि नंतर वरासह कुटुंबातील सदस्यांना आणि समाजाला तिने चांगलंच ऐकवलं. घरच्यांनी समजूत घालूनही नववधूने वृध्दाशी लग्न करण्यास होकार दिला नाही आणि गळ्यातील हार फेकून देत ती तिथून निघून गेली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ एका लग्न समारंभाचा असल्याचं दिसत आहे. जिथे एक वर लग्नाच्या मंचावर बसला आहे आणि त्याच्या शेजारी वधू लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की स्टेजवर वृद्ध वराला पाहून वधू भडकली आणि तिने लग्नाला स्पष्ट नकार दिला. नातेवाईक तिला समजावून सांगत होते की काय झालं, लग्न कर, पण मुलगी मानायला तयार नव्हती. ती म्हणाली - त्याच्याशी लग्न करून मला काय मिळणार? काही वर्षांनी हा निघून जाईल आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल. घरच्यांनी खूप समजावूनही वधूने कोणाचंच ऐकलं नाही आणि ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. बायको सोडून गेली म्हणून थेट लाऊड स्पिकर घेऊनच नवरा पोहोचला सासरच्या दारात; मग पुढे काय घडलं हे तुम्हीच वाचा या व्हिडिओचं कॅप्शन आहे- ‘नाक कापलं जाईल याचा विचार केला, पण त्यासोबत हा विचार नाही केला की मुलगी याच्यासोबत आयुष्य काढू शकेल’? हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे यावर आम्ही दावा करू शकत नाही. परंतु काही वापरकर्त्यांच्या मते, हा एक नाटकाचा समूह आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या लग्नाशी संबंधित अशा सर्व वाईट गोष्टींबाबत वेळोवेळी असे व्हिडिओ बनवत असतात आणि जनजागृती करतात. म्हणजेच हा व्हिडीओ गरिबी आणि मजबुरीत होणाऱ्या विवाहाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी बनवण्यात आला आहे.