JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: मनाविरुद्ध लग्न लावल्याचा राग? नवरीने नवरदेवासोबत स्टेजवरच केलं असं काही की सगळेच शॉक

VIDEO: मनाविरुद्ध लग्न लावल्याचा राग? नवरीने नवरदेवासोबत स्टेजवरच केलं असं काही की सगळेच शॉक

हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे, की तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये नवरी अगदी रागात नवरदेवाला वरमाळा घालताना दिसते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 28 मे : सध्या लग्नसराईचा हंगाम (Wedding Season) सुरू असून हा सीझन नेहमीच आनंद घेऊन येतो. लग्नामुळे दोन कुटुंबांनाच आनंद मिळत नाही, तर नातेवाइकांनाही अपार आनंद मिळतो. लग्नसमारंभात लोक नाचतात आणि गातात, उत्सव साजरा करतात. लग्नसराईचा सीझन येताच सोशल मीडियावरही त्यासंबंधीच्या व्हिडिओंचा पूर येतो. फेसबुक, ट्विटर इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सवर अनेकदा लग्नातील निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ इमोशनल करणारे. अर्रsss! नवरीबाईला वरमाला घालताच निसटली नवरदेवाची पँट; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO अनेकदा हे व्हि़डिओ लग्नातील डान्सचे किंवा वरमाळेच्या कार्यक्रमाचे असतात. ज्यात नवरी आणि नवरदेव एकमेकांना फुलांचा हार घालतात. सध्या समोर आलेला व्हिडिओही याच्याशीच संबंधित आहे (Viral Wedding Video). हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे, की तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये नवरी अगदी रागात नवरदेवाला वरमाळा घालताना दिसते.

संबंधित बातम्या

व्हिडिओ पाहून असं वाटतं जणू नवरीच्या इच्छेविरोधात तिचं या मुलासोबत लग्न लावलं जात आहे. सहसा नवरी आणि नवरदेव अगदी आनंदात एकमेकांनी हार घालताना दिसतात. मात्र या व्हिडिओमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळतं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत आणि दोघांच्याही हातात फुलांचे हार आहेत. नवरदेव आरामात उभा आहे तर नवरी आपल्या हातातील वरमाळा नवरदेवाच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करते. ती लांबूनच नवरदेवाच्या गळ्यात हार टाकते आणि त्यानेच नवरदेवाची मान खेचते. हार घालण्याचा ही पद्धत पाहून जाणवतं की नवरी भरपूर रागात आहे. कदाचित तिला या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं. 3 मुलांच्या बापाचं शेजारच्या तरुणीवर जडलं प्रेम; बिहारमधून महाराष्ट्रात पळवून आणलं, शेवटी वेगळाच ट्विस्ट हा हैराण कऱणार ‘मजेदार’ व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर priyajatav360 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 11 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने या लग्नाचं वर्णन ‘जबरदस्तीचं लग्न’ असं केलं आहे, तर दुसर्‍या युजरने मस्करीत लिहिलं आहे की, ‘ती हार घालत आहे की फाशी देत आहे’. आणखी एकाने कमेंट केली की कदाचित दीदीला सरकारी नोकरीवाला नवरदेव मिळाला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या