तेलंगणा, 30 ऑगस्ट : तुम्ही सिनेमांमध्ये किंवा मालिकांमध्ये पोलीस अगदी आरोपीला पकडण्यासाठी विविध स्टंट करतात. काही गाडीवर चढून तर काही त्याचा फिल्मी स्टाइनं मागोवा करून, मात्र आंध्र प्रदेशमध्ये एका खऱ्या सिंघमची चर्चा होत आहे. आंध्र प्रदेशातील एसआय गोपीनाथ रेड्डी सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. गोपीनाथ रेड्डी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दारुची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गोपीनाथ चक्क 2 किमी गाडीच्या बोनेटवर झोपल्याचे दिसत आहे. हा प्रकार शनिवारी घडला. गोपीनाथ यांना टीप मिळाली होती, अवैध दारुचा साठा घेऊन जाणारी एक गाडी आंध्रातील कडप्पा तालुक्याच्या दिशेने जात आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त केला होता. मात्र पोलिसांना पाहताच या आरोपीनं गाडी बॅरिगेट्स तोडून पळवली. वाचा- आता हेच बघायचं राहिलं होतं! रुग्णालयात मांजरीला मिळाली सिक्युरिटी गार्डची नोकरी
वाचा- बाईक चालकासमोर अचानक भिडले दोन बैल, पुढे काय झालं पाहा VIDEO आरोपी पळून जात असल्याचे कळताच गोपीनाथ रेड्डी यांनी फिल्मी स्टाइलनं गाडीच्या बोनेटवर उडी मारली, आणि 2 किमी आरोपीचा पाठलाग केला. हा सगळा प्रकार रस्त्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर आरोपीने गाडी थांबवली आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
वाचा- …आणि बघता बघता पाण्यात बुडालं भलं मोठं जळतं जहाज, पाहा थरारक LIVE VIDEO गोपीनाथ रेड्डी यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून आरोपीला पकडल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.