JOIN US
मराठी बातम्या / Viral / ...अन् अचानक सिंलिंगला लटकली मुलगी; नेटकरी म्हणाले, 'डान्स करतेय की घाबरवतेय'

...अन् अचानक सिंलिंगला लटकली मुलगी; नेटकरी म्हणाले, 'डान्स करतेय की घाबरवतेय'

सोशल मीडियावर अनेक मनोरंजनात्मक व्हिडीओ समोर येत असतात. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लोक अनेक निरनिराळ्या गोष्टी करताना दिसतात.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 मार्च : सोशल मीडियावर अनेक मनोरंजनात्मक व्हिडीओ समोर येत असतात. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लोक अनेक निरनिराळ्या गोष्टी करताना दिसतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, स्टंट व्हिडीओ पहायला मिळतात. काहीजण अनेक व्हिडीओ बनवूनही प्रसिद्धीस येत नाहीत तर काही एका रात्रीत चर्चेत येतात. असाच काहीसा व्हिडीओ सध्या समोर आला असून तरुणीचा डान्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल. सध्या सोशल मीडियावर एका मुलीच्या डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तरुणी विचित्र पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओ चर्चेत आला असून तरुणीनं व्हिडीओमध्ये नेमकं काय केलंय याविषयी जाणून घेऊया.

संबंधित बातम्या

व्हायरल होत असलेल्या या मजेदार व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की, एक मुलगी खोलीत नाचत आहे आणि ती खूप वेगाने धावत डान्स करते. डान्स करता करता ती कपाटावर चढते आणि तिथून ती खोलीच्या सिलिंगला लटकते. छताला लटकल्यानंतरही मुलगी नाचत राहते. तिच्या अशा डान्सच्या स्टाइलने सोशल मीडिया यूजर्सना घाबरवले आहे. व्हिडीओ जेवढा मजेशीर आहे तितकाच भीतीदायकही. आणि बहुतेक युजर्सनी तिच्या डान्सला भुताचा डान्स म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

हा डान्स व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाही. इन्स्टाग्रामवर बेपनाह इश्क नावाच्या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. व्हिडिओवर हजारांवर लाईक्ससोबतच हजारो कमेंट्सही आल्या आहेत. या डान्स व्हिडिओवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या