वॉशिंग्टन, 04 मे : सोशल मीडियावर स्टंटचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहूनच धडकी भरते. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आहे, ज्यात एक व्यक्ती 60 मजली टॉवरवर चढली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अमेरिकेतील गर्भपातविरोधी आंदोलनात ही व्यक्ती सहभागी आहे (Man climbing 60 floor Tower). अमेरिकेत गर्भपात अधिकारांबाबत आंदोलन होत आहे (Anti abortion protest). याचदरम्यान सॅन फ्रान्सिस्कोतील (San Francisco) हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. गर्भपाताला विरोध करणारी ही व्यक्ती. जिचं नाव मॅसन डेसचॅम्प्स असं आहे. मॅसन स्वतःला प्रो लाइफ स्पायडरमॅन म्हणवतो. टॉवरवर चढताना त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शिवाय त्यानेही टॉवर चढताना आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अँटी-अबॉर्शन मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने हे खतरनाक पाऊल उचल्याचं या पोस्टमध्ये सांगितलं.
द गार्डियन च्या रिपोर्टनुसार ज्या टॉवरवर ही व्यक्ती चढली आहे ते सेल्फोर्स टॉवर (Salesforce Tower) आहे. 60 मजले असलेले हे टॉवर 1070 फूट उंच आहे. मिशिशिपीच्या पश्चिम भागातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच बिल्डिंग, तर यूएसमधी 17 व्या क्रमांकाची सर्वात उंच बिल्डिंग आहे. हे वाचा - Shocking! उकळत्या तेलात चमच्याऐवजी हातानेच तळल्या भजी; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO इतक्या उंच टॉवरवर ही व्यक्ती कोणत्याही सुरक्षा साधनाशिवाय चढली आहे. व्हिडीओत पाहू शकता या व्यक्ती एक ग्रे रंगाची हुडी आणि पँट घातलं आहे आणि हातात फक्त हँडग्लोव्ह्ज आहेत.
या व्यक्तीला इमारतीवर चढताना पाहून सर्वांना धक्का बसला. इमारतीच्या खालून आणि इमारतीत असलेल्या लोकांनीही त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हे वाचा - कुटुंबाने घरात पाळला भलामोठा कोळी; वर्षभरानंतर… पाहूनच सर्वांना फुटला घाम त्याचे हे व्हिडीओ व्हायरल होताच आणि या घटनेची माहिती मिळताच सॅन फ्रान्सिस्को पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. त्या तरुणाला इमारतीवरून खाली उतरवून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.