JOIN US
मराठी बातम्या / Viral / सुंदर दिसण्यासाठी ती पार्लरमध्ये गेली, पण जेव्हा घरी परतली तेव्हा मात्र... नक्की काय घडलं?

सुंदर दिसण्यासाठी ती पार्लरमध्ये गेली, पण जेव्हा घरी परतली तेव्हा मात्र... नक्की काय घडलं?

सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये गेलेल्या महिलेसोबत असं काही घडलं की, ती विचित्रच दिसू लागली, नक्की असं काय घडलं

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो,सोर्स : istock

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 05 सप्टेंबर : सर्वांनाच सुंदर दिसण्याची इच्छा असते. सुंदर दिसल्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, एवढेच नाही तर चारचौघांमध्ये महत्व देखील मिळतं. ज्यामुळे बहुतांश लोक सुंदर दिसण्याकडे जास्त भर देतात. यामध्ये मुलींची संख्या सर्वात जास्त आहे. ज्यामुळे त्या पार्लरमध्ये जातात आणि आपल्या स्किन, केस, चेहऱ्यासाठी काही गोष्टी करतात. ज्यामुळे अनेक लोक सुंदर देखील दिसतात. परंतू एका महिलेसोबत भलताच प्रकार घडला, ज्यामुळे ती महिला सुंदर तर सोडाच पण फारच विचित्र दिसू लागली. बऱ्याचदा आपल्यासोबत असं घडतं की आपल्या एक्प्रिमेंट फसतो आणि या महिलेला देखील त्याचा चांगलाच अनुभव आला. ज्यानंतर तिला चारचौघात जाण्याची देखील सोय नव्हती. मैत्रिणींसोबत सहलीला जाण्यापूर्वी ही महिला सुंदर होण्यासाठी पार्लरमध्ये गेली, पण घरी परतल्यावर तिने पाहिलं की, तिच्या चेहऱ्यावर एक नाही तर चार-चार भुवया होत्या. थायलंडचा रहिवासी असलेल्या निपाप्रॉन मीकिंगसोबत ही विचित्र घटना घडली आहे, ज्यानंतर तिच आता आयुष्यात पुन्हा कधीही पार्लरमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त करणार नाही. हे वाचा : हॉटेलबाबत हे रहस्य तुम्हाला माहितीय का? बऱ्याच ठिकाणी नसते 13 नंबरची रुम, काय आहे यामागचं सत्य? आता या महिलेला आपल्या स्वत:चा चेहरा पाहून धक्का बसला आहे आणि ती याला कसं ठिक करु शकेल, हे तिचं तिलाच कळत नव्हतं. डेली स्टारच्या वृत्तानुसार, मित्रांसोबत सहलीला जाण्यापूर्वी तिला थोडे वेगळे आणि सुंदर दिसावे यासाठी ती निपाप्रॉन मीकिंग सलूनमध्ये गेली. जेथे तिने तिचे आयब्रो डार्क करुन घेतले. खरंतर ती टॅटू आर्टिस्टकडे गेली होती, ज्यांनी तिला आर्टीफिशिअल आयब्रो करुन दिले. परंतु तेथून ती घरी आली तेव्हा तिला स्वत:लाच पाहून भीती वाटली. त्यात आश्चर्याची गोष्ट अशी की, तिने हे आर्टीफिशिअर आयब्रो करण्यासाठी £35 म्हणजे 3200 रुपयांपेक्षा जास्त खर्च आला. तिने इतके पैसे देऊन देखील त्याचा परिणाम असा भयानक झाला.

हे वाचा : Live शोमध्ये अँकरने गिळली माशी, ती १ सेकंद थांबली आणि… Video सोशल मीडियावर व्हायरल इथ पर्यंत देखील सगळ ठिक होतं, परंतू यानंतर पुढे आणखी धक्कादायक गोष्ट समोर आली. जेव्हा ही महिला या पार्लरमध्ये पुन्हा तक्रार करण्यासाठी गेली. तेव्हा ते पार्लर बंद झालं होतं आणि तिला याच्या मालकाची भेट घेता आली नाही. ज्यानंतर अखेर या महिलेला दुसऱ्या टॅटू आर्टीस्टच्या मदतीने ते ठिक करावं लागलं. ही महिला तीन टॅटू आर्टिस्टकडे गेली, परंतू तरी देखील तिला कोणीही होकार दिला नाही. मग अखेर तिला एक असा टॅटू अर्टिस्ट मिळाला. ज्यानी तिला तो जून टॅटू काढून टाकण्यात मदत केली आणि शेवटी त्यावर नवीन आणि चांगले आयब्रो बनवून घेतले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या