प्रतिकात्मक फोटो
मुंबई 2 ऑक्टोबर : लग्न म्हटलं की रुसवे-फुगवे येतात, लोकांना मान-पान करायला जर मुलाकडचे किंवा मुलीकडचे कमी पडले, तर लोक खूप नाव ठेवतात. ज्यामुळे बऱ्याचदा लग्नात भांडणं देखील होतात. पण तुम्हाला काय वाटतं, लग्नातील ही अशी भांडणं फक्त भारतातच होतात? बाहेरील देशात असं होत नसावं? तर आज तुमचा हा गैरसमज दुर करुन टाका. खरंतर विदेशातील लग्नाची एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्ही म्हणाल की यापेक्षा तर भारतीयच बरे… खरंतर ही घटलेली घटना जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली, तेव्हा लोकांमध्ये त्याची जोरदार चर्चा रंगली. खरंतर एका प्रेमी जोडप्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या जवळील लोकांना लग्नाचं आमंत्रण दिलं. लोकं देखील त्यांच्या लग्नाला उपस्थीत राहिले. पण खरा ट्वीस्ट तर त्यानंतर सुरु आला. हे वाचा : ‘‘असे घाला अंडरगार्मेंट्स…’’ पाकिस्तानी एअरलाइंसकडून क्रू मेंबर्ससाठी अनोखा नियम ही घटना ब्रिटनमधील आहे. जिथे लग्नाच्या दिवशी एका पाहुण्याने मंडपातील केकचा तुकडा एक्ट्रा म्हणजेच जास्त खाल्ला, ज्याची त्याला भरपाई द्यावी लागली. Mirror.UK ने एका रिपोर्टनुसार, रिवाजानुसार लग्नात एका मोठ्या केकची व्यवस्था करण्यात आली होती आणि सर्व पाहुण्यांना केकचा प्रत्येकी एक-एक तुकडा घ्यायचा होता, परंतु एका पाहुण्याने एकापेक्षा जास्त केकचे तुकडे खाल्ले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हे वाचा : उंच डोंगराच्या कडेला गर्लफ्रेंडला प्रपोज करायला खाली बसला, पण तोल गेला अन्… VIDEO VIRAL यानंतर, या जोडप्याने लग्नाच्या काही दिवसांतच त्या पाहुण्याला व्हिडीओसह मेसेज दिला आणि त्याला अतिरिक्त 3.66 पौंड म्हणजेच सुमारे 333 रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. ते म्हणाले की, लग्नाच्या दिवशी पाहुण्यांना केकची किंमत देण्यास सांगितले गेले नव्हते. नग तरी देखील तुम्ही आमच्या पैशांचा केक जास्त खाल्ला, जे बरोबर नाही. आता तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. खरंतर या बातमीने भारतीयांमध्ये भलतीच चर्चा रंगली आहे. भारतीय तर असं देखील म्हणू लागले आहेत की, ‘यापेक्षा तर भारतच बरं’, तर एका युजरने गंमतीनं म्हटलं की, “भारतीय लग्नात तर लोक दोन दा काय, अनेकदा अशी डबल वस्तू घेतात, त्यांना जर असा दंड लावण्याचं ठरवलं तर मग झालंच….”