प्रीतम सिंह
आशीष शर्मा, प्रतिनिधी यमुनानगर, 22 जुलै : वाढते वय आणि स्थूल शरीरावरुन मित्रांनी केलेली गम्मत एका व्यक्तीने चांगलीच मनावर घेतली. प्रीतम सिंह असे या व्यक्तीचे नाव आहे. ते थेट 1996 चे मॉडल असलेल्या चेतक स्कूटरवर लद्दाखच्या खारदुंग-ला दर्रा येथे पोहोचले. त्यांचे वय 65 वर्ष आहे. तर वजन 135 किलो आहे. जर हिम्मत असेल तर वय हे कधीच आड येत नाही हे त्यांनी कुणाच्याही मदतीविना आणि आधुनिक सुविधांचा वापर न करता खारदुंग-ला पोहोचून सिद्ध केले आहे. प्रीतम सिंह हे आपल्या वडिलांच्या 1996 मॉडलच्या चेतक स्कूटवर स्वार होऊन 17 जूनला यमुनानगर हून खारदुंग-ला दर्रासाठी साठी रवाना झाले. त्यांना अनेक मित्रांनी सांगितले की, स्कूटरवर ते खारदुंग–ला येथे नाही पोहोचू शकणार. यासाठी हिमालयन बाइक असणे गरजेचे आहे. मात्र, त्यांचा निर्णय पक्का होता तसेच जिद्दही पूर्ण होती. त्यामुळे मग ते स्कूटरवर निघाले. या प्रवासादरम्यान, वादळ, वारा, पाऊस आणि दुर्गम रस्त्यातूनही प्रवास करताना त्यांच्या स्कूटरनेही त्यांना साथ दिली. विशेष म्हणजे, स्कूटरचे टायरसुद्धा पंक्चर झाले नाही.
प्रीतम सिंह यांनी आपल्यासोबत एक बॅग घेतली होती. या बॅगेत त्यांनी आपले कपडे ठेवले होते आणि एक कॅनमध्ये स्कूटरसाठी पेट्रोल घेतले होते. प्रीतम सिंह यमुनानगर येथून मनाली, मग बारालाचा दर्रा पोहोचले आणि चेतक स्कूटर वर सर्व दार्शनिक स्थळांवर फिरले. त्याच दिवशी प्रीतम सिंह हे स्कूटरवरच लेह साठी निघाले आणि तिथे पोहोचून त्यांनी ऐतिहासिक गुरुद्वारांवर जाऊन नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी खारदुंग–ला दर्रा साठी परमीट काढले आणि आपल्या स्कूटवर ते खारदुंग–ला दर्राच्या प्रवासाला निघाले.
येथे पोहोचल्यावरही ते पुढे चालतच राहिले. ते जिथे-जिथे गेले तिथे त्यांच्या या जिद्दीला पर्यटकांनी आणि स्थानिकांनी सलाम केला. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत सेल्फीही घेतला. प्रीतम सिंह हे आपल्या चेतक स्कूटरव भारताच्या अंतिम टोकाला तुरतुक आणि थांव गावात पोहोचले. मात्र, इथून पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे ते तिथून परत झाले आणि पैंगोंग धबधब्याच्या मार्गाने जम्मूला पोहोचले. जम्मू येथे रात्री पोहोचल्याने ते थेट आपल्या घरी यमुनानगर येथे परतले. पत्नी काय म्हणाल्या - घरी परतल्यावर प्रीतम सिंह यांच्या पत्नी बलबीर कौर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, प्रीतम सिंह यांनी इतक्या दूर जायचे एकट्याने ठरवले होते. त्यांनी 17 जूनला सकाळी 5 वाजता, ते जात आहेत, फक्त इतकेच सांगितले. हे ऐकून त्यांना फार आश्चर्य वाटले. मात्र, प्रीतम सिंह यांनी पूर्ण तयारी केली होती आणि पत्नीला मिठीत घेत ते रडू लागले. मात्र, यानंतर बलबीर कौर काही बोलण्याआधीच त्यांनी एक सेल्फी घेतला आणि देवाचे नाव घेत आपल्या प्रवासाला ते निघून गेले. 66 वर्षे वय असताना ते 135 किलो वजन असूनही कुल्लू, मनालीच्या मार्गाने एकप्रकारे हिमालयाची परिक्रमा करुन जम्मू काश्मिरच्या मार्गाने परत आले. ही बाब कोणत्याही आश्चर्यापेक्षा कमी नाही. त्यांच्या या निर्णयाने, ज्या लोकांनी त्यांना टोमणे मारले होते, त्यांना सर्वांना शांत केले आहे. तसेच जे लोक साधन नसल्याने आपल्या प्रवासात अडचणी आहे, असे मानतात त्या लोकांसाठीही ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.