JOIN US
मराठी बातम्या / Viral / रुळावरुन घसरलेले ट्रेनचे डब्बे पुन्हा ट्रॅकवर कसे चढवले जातात? हा VIDEO एकदा पाहाच

रुळावरुन घसरलेले ट्रेनचे डब्बे पुन्हा ट्रॅकवर कसे चढवले जातात? हा VIDEO एकदा पाहाच

ट्रेन रुळावरुन घसरुन अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. पण कधी विचार केला आहे का, की ट्रेन एकदा रुळावरुन उतरल्यानंतर ती पुन्हा रुळावर कशी चढवली जाते?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जानेवारी : रेल्वे अपघातांविषयी तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असे काही भयंकर अपघात झाले आहेत, की त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमध्ये ट्रेन रुळावरुन उतरुन अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. पण कधी विचार केला आहे का, की ट्रेन एकदा रुळावरुन उतरल्यानंतर ती पुन्हा रुळावर कशी चढवली जाते?

हे वाचा -  धबधब्याजवळ भलामोठा खडक कोसळला; 7 जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO

व्हायरल कंटेंटसाठी प्रसिद्ध फेसबुक पेज Hmmmmmm वर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये रुळावरुन उतरलेल्या ट्रेनला पुन्हा रुळावर चढवताना दाखवलं गेलं आहे (How a derailed train is re-railed). ट्रेन रुळावरुन घसरल्याचं अनेकदा ऐकलं आहे. पण ट्रेनचे डब्बे इतके भारी-भक्कम असतात, ते पुन्हा रुळावर कसे घेतले जातात?

हे वाचा -  अभिमानास्पद! हाडं गोठवणाऱ्या थंडीत सैनिकांची गर्भवती महिलेसाठी 6.5 किमीची पायपीट

व्हिडीओमध्ये प्लॅस्टिकचे दोन मोठे प्लॅटफॉर्म्स रुळावर ठेवलेले दिसतात. ट्रेनचा जो डब्बा रुळावरुन घसरला आहे, त्याला एका इंजिनच्या साहाय्याने रश्शीला बांधून खेचलं जात आहे. डब्ब्याची एक बाजू रुळावरुन खाली आलेली दिसतेय. काही अंतरापर्यंत डब्बा रुळावरुन खाली असताना तसाच पुढे रश्शीच्या साहाय्याने खेचला जातो. परंतु रेल्वेचा डब्बा जसा प्लॅस्टिकच्या प्लॅटफॉर्मजवळ येतो, तसा तो प्लॅस्टिकवर चढतो आणि हळूहळू संपूर्ण रेल्वेचा डब्बा रुळावर परत येतो.

फेसबुकवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत 1 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 33 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. अनेकांनी अशा प्रकारचा व्हिडीओ आधी कधीही न पाहिल्याची प्रतिक्रियाही दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या